ajintha leni information in marathi:अजिंठा लेणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे.अजिंठा लेणी प्राचीन भारतीय कला आणि स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते.ज्या स्थानांना सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व दिले जाते अशा स्थळांना युनेस्को कडून जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली जाते. एखाद्या स्थळाला जर जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले तर त्या संपूर्ण स्थळाच्या देखबालासाठी आणि सौरक्षणासाठी युनेस्को कडून अनुदान दिले जाते.
Contents
अजिंठा लेणी माहिती मराठी (ajintha leni information in marathi)
अजिंठा लेणी हे ठिकाण महाराष्ट्रातील पहिले जागतिक वारसा स्थळ आहे.अजिंठा लेणी हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील औरंगाबाद या जिल्ह्यामधील लोकप्रिय ठिकाणी आहे. युनेस्को या जागतिक संघटनेने अजिंठा लेणीला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.औरंगाबाद या शहरापासून या लेण्या जवळजवळ 107 किलोमीटर येवढ्या अंतरावर आहे.बौद्ध धर्माशी संबंधित चित्र आणि कारागिरीचे उत्कृष्ट नमुने आपल्याला या ठिकाणी पहायला मिळतात.अजिंठा लेनित 19 बौद्ध लेण्यांचा समूह आहे या लेण्यांमध्ये गौतम बुद्ध यांची भावमुद्रा व सुंदर चित्र रंगवलेले आहेत.
तसेच या लेण्या कोरण्या साठी शेकडो वर्षे एवढा कालावधी लागलेला आहे.ब्रिटिश अधिकारी जॉन स्मित हा शिकारीसाठी जंगलात गेल्यावर त्यांना या लेण्या नजरेस पडल्या आणि तेव्हापासूनच अजिंठा लेणी प्रकाशझोतात आली.अजिंठा लेणीला संपूर्ण देश विदेशातून पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात.या लेण्या वर्षभर पर्यटकांसाठी खुल्या असतात. संपूर्ण वर्षभरामध्ये ऑक्टोंबर ते मार्च हा कालावधी लेण्यांना भेट देण्यासाठी उत्तम समजला जातो.पावसाळ्यामध्ये ही बरेच पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येथे येत असतात.
अजिंठा लेणी पाहण्यासाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत प्रवेश दिला जातो. सर्वसामान्य पर्यटकांसाठी दर सोमवारी लेण्यांमध्ये जाण्यासाठी प्रवेश बंद असतो.अजिंठा लेणी हे पर्यटन स्थळ भारतीय पुरातन विभागाच्या अधिनियत असल्याने या ठिकाणी प्रत्येक भारतीय व्यक्तीला प्रवेश द्यावी लागते.भारतातील प्रत्येक पर्यटकांसाठी या ठिकाणी 40 रुपये एवढी फी आकारली जाते.तसेच विदेशी पर्यटकांकडून 250 रुपये एवढी फी आकारली जाते.
अजिंठा लेण्यांचा इतिहास
अजिंठा लेण्यांचे उत्खनन सातवाहन घराण्याच्या काळात करण्यात आले, ज्याने इ.स.पूर्व दुसर् या शतकापासून इ.स.च्या दुसर् या शतकापर्यंत भारताच्या दख्खन प्रदेशावर राज्य केले. इसवी सनाच्या सहाव्या शतकाच्या सुमारास ही लेणी सोडून देण्यात आली आणि 1819 मध्ये ब्रिटिश सैनिकांच्या एका गटाने त्यांचा पुन्हा शोध लावला.
अनेक शतकांच्या कालखंडात या लेण्या बांधल्या गेल्या आणि विविध राज्यकर्त्यांनी या संकुलात भर घातली. लेण्यांचा उपयोग बौद्ध शिक्षण आणि उपासनेचे केंद्र म्हणून केला जात असे आणि बऱ्याच लेण्यांमध्ये बौद्ध विषयांचे चित्रण करणारे गुंतागुंतीचे कोरीव काम आणि चित्रे आहेत.
अजिंठा लेण्यांची वास्तुकला
अजिंठा लेण्यांमध्ये ३० खडकांनी कापलेल्या लेण्या आहेत, ज्या दोन गटात विभागल्या गेल्या आहेत: आधीची हीनयान लेणी आणि नंतरची महायान लेणी. हीनयान लेणी डिझाईनमध्ये सोपी असून त्यात साधे चैत्य हॉल आणि विहार आहेत. दुसरीकडे, महायान लेणी अधिक विस्तृत आहेत आणि त्यात गुंतागुंतीची कोरीव शिल्पे आणि चित्रे आहेत.
कसे पोहचावे
अजिंठा लेणी या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर जळगाव रेल्वे स्थानक हे सर्वात जवळ चे रेल्वे स्थानक आहे.आणि जर तुम्ही रोडने जाणार असाल तर औरंगाबाद जळगाव या महामार्गावरून प्रायव्हेट गाडीने किंवा बसणे प्रवास करून शकता.
अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहेत.
अजिंठा लेणी कधी कोरण्यात आली?
अजिंठा येथील पहिली बौद्ध लेणी स्मारके इ.स.पू. 2रे आणि 1ल्या शतकातील आहेत.
अजिंठा लेणी चित्रांचा शोध कोणी लावला?
अजिंठा लेणी किती आहे?
अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघूर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत.
अजिंठा आणि एलोरा लेण्यांमध्ये काय फरक आहे?
अजिंठा हे मुख्यतः बौद्ध धर्माच्या थीमवर गुहेच्या भिंतींवर बनवलेल्या सुंदर चित्रांबद्दल आहे, तर एलोरा हे त्या काळात देशात प्रचलित असलेल्या तीन भिन्न धर्मांशी संबंधित शिल्पकला आणि वास्तुकला बद्दल आहे
अजिंठ्याची मुख्य वैशिष्ट्ये कोणती?
अजिंठ्यामध्ये तीस लेणी आहेत, प्रत्येक बुद्धाच्या जीवनाला समर्पित आहे. प्रत्येक गुहा शिल्पकला, भिंत भित्तीचित्रे आणि छतावरील चित्रांनी भरलेली आहे .
निष्कर्ष (summary)
आजच्या या पोस्ट मध्ये आपण अजिंठा लेणी माहिती मराठी (ajintha leni information in marathi) ही माहिती बघितली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.