उभयान्वयी अव्यय माहिती मराठी | ubhayahvyi avyay in marathi

ubhayahvyi avyay in marathi : उभयान्वयी अव्यय म्हणजे जे शब्द दोन किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

ubhayahvyi avyay in marathi
उभयान्वयी अव्यय माहिती मराठी  (ubhayahvyi avyay in marathi)

उदाहरणार्थ

 • त्याचे पत्र आले आणि मी निघालो.
 • तो येईल किंवा माधव येईल, यामधील आणि व किंवा हे उभयान्वयी अव्यय आहेत.

उभयान्वयी अव्ययवाचे मुख्य आठ प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे.

 • समुच्चयबोधक
 • विकल्पबोधक
 • न्यूनत्वबोधक
 • परिणामबोधक
 • स्वरूपबोधक
 • कारणबोधक
 • उद्देशबोधक
 • संकेतबोधक

उभयान्वयी अव्यय माहिती मराठी (ubhayahvyi avyay in marathi)

समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय

समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन प्रधान किंवा मुख्य वाक्यांना जोडताना त्यांचे समुच्चय करतात व पहिला विधानात आणखी भर घालतात त्या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदाहरणार्थ

शिक्षक आले व त्यांनी शिकवले. तर व हा उभयान्वयी अव्यय होय. तर आणखी याच्यात काही शब्द येतात ते म्हणजे आणि, शिवाय, आणखी, अन्, न, नी इत्यादी.

विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय

विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन किंवा अनेक गोष्टींपैकी कोणतेतरी एक म्हणजे हे किंवा ते असा अर्थ बोध होतो, त्यास विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदाहरणार्थ

तुम्ही चहा घ्याल की कॉफी घ्याल, तर यामध्ये की हा विकल्प बोधक उभयान्वयी्यय आहे. तर यासारखे अजून काही यामध्ये शब्द येतात ते म्हणजे अथवा, वा, की, किंवा, अगर इत्यादी.

न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय

न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे पहिल्या वाक्यात काही उणीव, दोष कमीपणा असल्याचे सुचवितात असा अर्थ बोध होतो. त्यास न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदाहरणार्थ

ताईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक आहे. यामध्ये बाकी हे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
आहे. तर यामध्ये आणखी शब्द येतात ते म्हणजे पण, परंतु, तरी, किंतू, बाकी इत्यादी.

परिणामबोधक उभयान्वयी अव्यय

परिणामबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे पहिल्या वाक्यात जे घडलेले सांगण्यात आले त्याचा परिणाम हा पुढील वाक्यावर झाल्याचे सुचवितात म्हणजे दुसरे वाक्य पहिल्या वाक्याचा परिणाम असतो. त्यास परिणाम बोधक उभयान्वयी असे म्हणतात.

उदाहरणार्थ

अतुल ने मनापासून अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले. तर म्हणून हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. यासारखे आणखी काही शब्द येतात ते म्हणजे म्हणून, तेव्हा, याकरिता, सबक, यास्थाव, तत्मा इत्यादी.

स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय

स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे ज्या अव्ययाने मागील शब्दाच्या किंवा वाक्याचे स्वरूप उलगडून सांगितलेले असते त्यास स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदाहरणार्थ

एक रुपया म्हणजे शंभर पैसे, तो म्हणाला की मी हरलो, दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला, यामध्ये म्हणजे, की, म्हणून ही स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय आहेत.

कारणबोधक उभयान्वयी अव्यय

कारणबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे ज्यातील दुसरे दोन वाक्य हे पहिल्या प्रधान वाक्याचे कारण आहे असा अर्थ होतो त्यास कारणबोधक उभयान्वयी असे म्हणतात.

उदाहरणार्थ

त्याला बडती मिळाली कारण त्याने चोक काम केले, आम्हाला हेच कापड आवडते का की ते स्वदेशी आहे. यामधील कारण व की हे कारणबोधक उभयान्वयी आहे.

उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय

उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे जेव्हा दोन वाक्य मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे असा अर्थ बोध होतो तेव्हा त्यास उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदाहरणार्थ

चांगली नोकरी मिळाली म्हणून तो पुण्याला गेला, विजेते पद मिळाले यास्तव त्यांनी खूप प्रयत्न केले. यामधील म्हणून व यास्तव हे उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय आहे.

संकेतबोधक उभयान्वयी अव्यय

संकेत बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे ज्या उभयान्वयी अव्ययामुळे पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते व पहिल्या वाक्य गौण व दुसरे वाक्य मुख्य असते. तेव्हा त्या संकेत बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदाहरणार्थ

जर शाळेला सुट्टी मिळाली तर मी खेळायला येईल, तू माझ्याकडे आलास की मी तुझ्याकडे येईल, यामधील तर व की हे संकेत बोधक उभयान्वयी अव्यय आहे.

केवलप्रयोगी अव्यय

केवलप्रयोगी अव्यय म्हणजे एकाएकी मनात हर्ष, भीती, तिरस्कार इत्यादी विकार निर्माण झाले असता ते दर्शविणारे आवीकारी शब्द तोंडातून बाहेर पडतात. त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरणार्थ

ओहोहो, अबब, अरेरे, आइग, छे, शे इत्यादी.

केवल प्रयोग अवयवाचे एकूण दहा प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे.

 • हर्षदर्शक
 • शोकदर्शक
 • आश्चर्यदर्शक
 • प्रशंसादर्शक
 • संमतीदर्शक
 • विरोधदर्शक
 • तिरस्कारदर्शक
 • संबोधनदर्शक
 • मनदर्शक
 • व्यर्थअव्यय

निष्कर्ष (summary)

आजच्या या पोस्ट मध्ये आपण उभयान्वयी अव्यय माहिती मराठी (ubhayahvyi avyay in marathi) ही माहिती बघितली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment