शिखर शिंगणापूर माहिती मराठी | Shikhar shinganapur information in Marathi

shikhar shinganapur information in Marathi:शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील एक गाव आणि धार्मिक स्थान आहे.येथे सातारा सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर ऐतिहासिक काळापासून हे शंभू महादेवाचे मंदिर अस्तित्वात आहे.सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून 20 किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर हे गाव वसले आहे. या लेखात आपण शिखर शिंगणापूर माहिती मराठी (Shikhar shinganapur information in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

shikhar shinganapur information in Marathi
शिखर शिंगणापूर माहिती मराठी (Shikhar shinganapur information in Marathi)

शिखर शिंगणापूर माहिती मराठी (Shikhar shinganapur information in Marathi)

फलटण पासून आग्नेयस सुमारे 37 किलोमीटर एवढे अंतर आहे इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेव चा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर हे गाव आहे. हा डोंगर म्हणजेच सह्याद्रीचा एक फाटा असल्याचे डोंगरावर झाडे आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्रसपाटीपासून 1050 मीटर उंचीवर आहे. मंदिरात जायला जवळपास 400 पायऱ्या चढून जावे लागते त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे.

नंदीच्या दर्शनानंतर आपण मुख्य मंदिराकडे निघावे मंदिराच्या पायरीवर आपल्याला नतमस्तक पार्वती दिसते.लोटांगण घातलेली पार्वतीची शिल्प चांदी मध्ये कोरलेले असून अतिशय देखणी आहे. शंकराला शरण गेली पार्वती यात दिसते यापुढे कासवाचे दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो.

शिंगणापूरच्या डोंगरावरून एक तलाव दिसतो त्याची नाव पुष्कराज तलाव असून तो माळोजी राजे यांनी बांधला आहे.शिंगणापूर देवस्थान हे भोसले राज घराण्याचे खाजगी संस्थानाच्या ताब्यात असून महा दिव्याचा सेवेचा मान पाच वेगवेगळ्या जमातींना दिलेला आहे. ब्राह्मण हा मुख्य पुजारी असून देवाच्या नित्य पूजेचे काम ते पाहतात. गुरवाणा नंदीच्या पूजेचा मान दिला आहे. कोळी समाजाचे लोक देवाच्या अंगाराची व्यवस्था पाहतात.

जंगम लोक देवाच्या नैवेद्याची तयारी करतात. पाकशाळा महादेवाच्या मंदिराखाली असून जंगम तेथेच राहतात.गाडशी जमातीतील लोक नगारा खाण्याची व्यवस्था पाहतात.सर्व धर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे ठिकाण म्हणजे शंभू महादेवाचे मंदिर. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली हे तीर्थक्षेत्र आहे. नंदीच्या समोर एक भला मोठा अष्टकोन कोरलेला आपणास दिसतो. या अष्टकोनामध्ये शिवाजी महाराजांनी शंभूराजांचे शुद्धीकरण करून घेतले होते.

महादेवाच्या गाभाऱ्यात दोन लिंग असून त्यापैकी एक शंकर व एक पार्वतीचे आहे.लिंगावर अनेक लेप लावून आता ते गुळगुळीत झाले आहेत. शिंगणापूरचे हे लिंग स्वयंभू आहे असे म्हटले जाते. मंदिराच्या बाहेरील नंदी दगडाचा असून त्यावर आता पत्रा बसवला आहे. नंदीचा मंडप 100 कमळाच्या बनविला आहे. अनेक वेगवेगळ्या अख्यायिका येथे ऐकायला मिळतात.

सोमनाथ मंदिरातील गडगडचे संपत्ती लुटण्यासाठी गजनीच्या मोहमदाने असंख्य वेळा व देवळाच्या व देवाच्या विध्वंस केला.यापैकी एका आक्रमणाच्या वेळी तेथील सोमनाथांची लिंग स्वराष्ट्रातून महाराष्ट्रात आणून ती शिंगणापूर येथे स्थापन केले असे आख्यायिका आहे.आजही महाराष्ट्र शिवाय कर्नाटकातून अनेक भक्तजन शिंगनापूर यात्रेला येतात.ते लोक या महादेवाला आपले कुलदैवत मानतात. लिंगाचे दर्शन घेऊन मंदिराला फेरी मारताना महादेवाच्या मंदिरामागे अनेक लहान देवळे दिसतात. एका देवळात प्रचंड मोठी घंटा दिसते ही घंटा पंचधातूची असून ती एका चर्चा मधून आणली असावी असा अंदाज आहे.

या घंटावर रोमन अक्षरात 1720 असे लिहिले आहे. मंदिरा बाहेर दोन दीपमाळ आहेत. ज्या शिवाजी महाराजांनी बांधले आहेत. त्यातील एक दीपमाळ महाराजांनी आपल्या सेविकेच्या नावाने बांधली असून त्यांचे नाव वीरूभाई असे होते.प्रत्येक मंदिरात गणपतीला स्थान असते तसेच येथेही गाभाऱ्याबाहेर गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. या गणपतीच्या मंदिराचे विशिष्ट म्हणजे येथे दोन सरते दगडी खांब आहेत.पुरानात शिल्पा कलेचा अनोखा नमुना येथे पाहायला मिळतो.

मंडपाच्या एका भिंतीवर कलियमर्दनाचे सुंदर शिल्प कोरलेले दिसते. मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत.एक मुख्य प्रवेशद्वार असून तीन उपप्रवेशद्वार आहेत.दक्षिणेकडील प्रवेशद्वारातून बाली मंदिराचे दर्शन घडते तर पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून शिवाजी महाराजांचे स्मृतीसह पाहायला मिळते.मंदिराच्या दक्षिण दिशेस सुमारे 100 यार्डंवर दुसरा टेकडीवर दगडी बांधकाम आढळून येते.

शिखर शिंगणापूर माहिती मराठी (Shikhar shinganapur mahiti Marathi)

 येथे तीन स्मारके आहेत. एका ओळीत असणारी ही स्मारके दक्षिणेकडे तोंड करून आणि पूर्व पश्चिम विस्तारलेले आहेत. पश्चिमेकडे स्मारक हे शिवाजी महाराजांचे असून मधले शहाजी महाराज आणि पूर्वेकडील संभाजी महाराजांची आहे. ऑगस्ट 1669 मध्ये संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली.त्यानंतर गादीवर आलेला शाहू महाराजांनी या स्मारकाची बांधणी केली.

मंदिर दोन भागांमध्ये विभागले गेले आहे. मुळ गाभारा आणि बाहेरचा सभामंडप सभा मंडपाचा आकार चांदणी प्रमाणे आहे. मंडपाला भिंतीचा आधार नसून तो 12 भक्कम खांबावर बांधला गेला आहे. सध्या अनेक लहान काम आधारासाठी बांधले आहेत.संपूर्ण मंदिरांच्या खांबावर पुराणातील अनेक कथा शिल्प रुपात कोरले गेले आहेत. एका शिल्पात स्त्री शिकार करताना दर्शविले आहे तसेच कुत्र्याचा वापर शिकारीसाठी दाखवला आहे.

एका शिल्पात पुरुषाने बंदूक वापरताना कोरलेला आहे.काही खांब हे फुल वेलीचे नक्षीत कोरलेले आहेत.शिखर शिंगणापूर देवस्थान शिंगणापूरच्या डोंगरावर बसलेले आहे आणि येथील मंदिर अतिशय पुरातन असून मोठ्या मोठ्या दगडी खेळांमध्ये घडवलेले आहे.मंदिराचा एकूण परिसर अंदाजे एक एकर असावा. मंदिरात जाण्यासाठी सुमारे 150 चढाव्या लागतात.

परंतु आता रस्त्याची सोय केल्याने गाड्या सरळ मंदिरापर्यंत जातात.हे मंदिर यादवकाळात बांधले गेलेले असून परिसराचे नाव शिंगणापूर हे यादव राजा शृंगारपूर यांच्या नावावरून देण्यात आले आहे. यादवकालीन हे मंदिर हेमाडपंथी बांधकामाची साक्ष देते.शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जिर्णोद्धार करताना मूळ मंदिराच्या सौंदर्यात कमीपणा येणार नाही याची काळजी घेतली आहे.हे मंदिर इसवी सन पूर्व 1200 शतकातील असून आजही भक्कम आहे. शिखर शिंगणापूर माहिती मराठी (shikhar shinganapur information in Marathi)

शंभू महादेवांच्या मंदिराजवळ डोंगराच्या खाली अमृतेश्वरांची मंदिर आहे. हे मंदिर बाली महादेवाचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे हेही मंदिर जुन्या दगडी बांधकामाची साक्ष देते. बाली महादेवाच्या मंदिरात आपल्याला शंकराच्या पिंडीत गायीची खूर उमटलेले दिसतात. शिखर शिंगणापूरच्या डोंगरावर शिवपार्वतीचे लग्न विष्णू ने लावून दिले शिव आणि हरी हे वेगळे नसून एकच आहेत आणि भक्तांची भेद विसरून जावे हा संदेश येथे देण्यात आला आहे.

या संदेशाची रूपक असणारे शिल्प शिंगणापूरच्या मंदिराच्या कामावर दिसते.त्यात एक हत्ती आणि एक नंदी आहे हत्तीचे शरीर झाले तर नंदी दिसतो जो शंकराचे वाहन आहे आणि नंदीचे शरीर झाकले तर हत्ती दिसतो जो विष्णू चव्हाण आहे.

शिखर शिंगणापूर मंदिराची आरती

सकाळी 6 वाजता काकड आरती करून देवाला उठवले जाते.दुपारी 12 वाजता देवाची आरती आणि रात्री 8 वाजता सांज आरती अशी करून मंदिर बंद केले जाते. रात्री नऊ वाजता शेजारती प्रतीक आरती नंतर जंगमने केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.

देवस्थानाचे कार्यक्रम

महाशिवरात्री

महाशिवरात्री ही शंकरांच्या भक्तांसाठी मोठी परवणी आहे.महाशिवरात्रीला शंकराला बेल वाहण्याचा मोठा कार्यक्रम असतो. महाशिवरात्रीचा महोत्सव पाच दिवस चालतो. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भजन व कीर्तनाचा कार्यक्रम असतो. दर अमावस्येला शिखर शिंगणापूरची वारी असते. अनेक भक्तजन अमावस्येला महादेवाचे दर्शन करून मग गुप्तलिंगाला भेट देऊन आपापल्या घरी जातात.आषाढी वारीला नियमित जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे भक्तगण महादेवाच्या वारीला येतात. यात्रा म्हणजे देवाचे लग्न हा वार्षिक उत्साह अतिशय नयनरम्य असा सोहळा असतो.याची अनुभूती याची देही याची डोळा पहावी. 

शिखर शिंगणापूरचा मुंगी घाट सोहळा

चैत्र शुद्ध द्वादशी मुंगी घाटातून कावड आणताना चैत्र शुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडीमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भूत्या तेलाची या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात व ते वर घेऊन जाणे हे तशी कष्टाचे काम आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायले त्यालाच मदतीला बोलवतात.मग ही कावड वर नेले जाते आणि महादेवाला अभिषेक होतो.

पूर्वीच्या पायऱ्यांच्या रस्त्यावरून मंदिराकडे येताना एक भर भक्कम वेश लागते ही वेश शिवाजी महाराजांनी बांधली असून तिला जिजाऊ वेश असेही म्हणतात. वेशीतून आत येताना एक अतिशय सुंदर आणि तेवढेच भक्कम दरवाजा लागतो त्याला शेडगे दरवाजे म्हणतात. शिखर शिंगणापूरचे दर्शन घेताना त्याच्या सभोवताच्या निसर्गाची व तेथील अनमोल इतिहासाची जाणीव होते. शेडगे दरवाजा ओलांडल्यानंतर आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो तेथेच आपल्याला दीपमाळ पाहायला मिळते.

डाव्या हाताला नगर खाना आहे आणि समोरच पंचनदीचे दर्शन आपल्याला घडते. पूर्वी तेथे एकच नंदी होता नंतर कोना एका भक्ताने आपले नवस फेडण्यासाठी चार नंदी अर्पण केले.

शिखर शिंगणापूरचे ऐतिहासिक महत्त्व

शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव म्हणजे महाराष्ट्रातील अनेकांचा कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर व शिंगणापूर हे गाव दोन्हीही यादव कुळातील सिंधन राजाने वसवली आहेत असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारामध्ये पाच मोठे नंदी आहेत. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंधन राजा येथे येऊन राहिले होते. त्यांनीच शिंगणापूर गाव वसविले.

शंभू महादेव हे भोसले घराण्याची कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे  भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी येथे इसवी सन 1600 साली येथे एक मोठे तळे येथे बांधले त्यास पुष्कर तीर्थ असे म्हणत. त्यालाच आता शिवतीर्थ असे म्हणतात. पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे 1735 मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले.

1978 मध्ये त्यांचाही जिनत्वावर झाला. दक्षिणेतील राम स्वामी नावाच्या एका स्थापत्य तज्ञांकडून शिखराची व मंदिराची दगजुटी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे.शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर व पार्वती यांचा विवाह चा मुख्य सोहळ्यांपैकी असतो. तत्पूर्वी चैत्रशुद्ध प्रतिपदेचे विवाहाचा मुहूर्त म्हणून हळकुंड हळद जात्यावर दळली जाते.

चैत्रशुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वराडी म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पार्वती मातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात. चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभू महादेव मंदिराची शिखर कळस बांधून ते श्री अमृतेश्वर बळी मंदिराची शिखर कळस यांना पागोटे सुताची जाड दोरी बांधली जाते.यासाठी लागणारी पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात लग्नासाठी 550 फूट पागोटे विणले जाते.

या शंभू महादेवांचा लग्नाचा आहेर मानला जातो. ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात आणि रात्री बारा वाजता मंगलाष्टके व सनई चौघडांच्या गजरात शंभू महादेव व पार्वती मातेचा विवाह सोहळा हर हर महादेव च्या जयघोषात पार पाडला जातो.चैत्र शुद्ध एकादशीस इंदौर चे राजे कूळसर महादेवांचे दर्शन घेत.

शिखर शिंगणापूर यात्रा

शिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते यात्रेची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. शुभ शकुनांची गुढी उभारून श्री क्षेत्र शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो.पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाची लग्न लावली जातात. एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राजघराण्यातील युवराज किंवा राजा शंकर शिंगणापूर ला येतो आणि देवस्थानातर्फे राजांचा सत्कार समारंभ केला जातो.

असे म्हणतात की देवांना लग्नाच्या वेळी चुकून राजाला आमंत्रण गेले नाही राजा रागवून घोड्यावरून निघाला आणि तडक शिखर शिंगणापूरला आला. एकादशी दिवशीचा उपवास असूनही देवावर रागावला आणि कांदा भाकरी खाऊन व पायात जोडे ठेवून देवाच्या लग्नाला आला. महादेवाने राजाची समजूत काढली राजाचा राग शांत झाला आणि राजाचा सत्कार केला.आजही हीच परंपरा राखली जाते.

शिखर शिंगणापूर ची यात्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबन येथे भरली जाते. या उमाबनात प्रत्येक गावासाठी एक झाड दिले आहे. गावकरी आपापल्या झाडापाशी जमा होऊन यात्रेचा आनंद लुटतात.अशा प्रकारे झाडे नेमून देणारी ही पहिलीच यात्रा असावी. शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील सर्वात अद्भुत सोहळा म्हणजे पालखी सोहळा. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थक्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते.

बऱ्याच गावातून अनेक कावडी येतात पण मानाची कावड भूतोजी तेली याची असते. यांची कावड सासवड या गावातून येते. यात्रेअगोदर ही मानाची कावड सासवड प्रस्थान करते.फार पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे. देवाला जाताना नी संकोच मनाने जावे आणि मागे काही ठेवू नये. ज्याच्या चिंतेने देवाचे दर्शन व्यवस्थित होणार नाही. दुपारपर्यंत त्यांची कावड ही देवाच्या पायथ्यापर्यंत पोहोचत असत दुपारनंतरही कावड अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चढत जाते.

हे दृश्य फारस मोहक असते.सध्या गाड्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवला आहे. पण आजही शिखर शिंगणापूरला येणाऱ्या कावडी घोड्यांच्या मुंगी घाटातून वर मार्ग काढतात मानाच्या कावडी मागे इतरही कावडी मार्गस्थ होतात. सर्व भाविक देवाच्या या विलोभनीय सोहळ्यात मनोभावे सामील होतात. सर्व बांधव एकत्र येऊन देवाचा सोहळा उत्तम रीतीने पार पाडतात.कावड सोहळा हा अत्यंत नयनरम्य असतो.

कावड चढवत असताना हलगी आणि लेझीम यांच्या तालावर अनेक भक्तजन आपापल्या नाचायला पाहायला मिळतात. कावड ही सहा खांद्यांवरून आणली जाते. पुढे तीन आणि मागे तीन असे सहा कावडी एक कावड घेऊन शिखर शिंगणापूर वाट पूर्ण करतात. कावड्यातील पाणी निरा नदीच्या पात्रातून भरून आणले जाते. या सोहळ्यात अनेक जण कावडीचे दर्शन घेतात.लहान मुलांना कावडीच्या खाली झोपवले जाते त्यामुळे लहान मुलास देवाचा आशीर्वाद मिळतो अशी समजूत लोकांमध्ये आहे.

आजही भुतोजी तेली यांचे वंशज शिखर शिंगणापूरच्या यात्रेस येतात.द्वादशीला रात्री बारा वाजता कावडीच्या पाण्याने देवाला अभिषेक केला जातो. त्यानंतर चिमणगाव तालुका कोरेगाव येथील पालखीची मिरवणूक काढण्यात येते. या सोहळ्यानंतर श्री शिखर शिंगणापूरची यात्रा संपते आणि सर्व यात्री करूचा परतीचा प्रवास सुरू होतो.  

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण शिखर शिंगणापूर माहिती मराठी (shikhar shinganapur information in Marathi) ही माहिती जाणून घेतली. शिखर शिंगणापूर माहिती मराठी (shikhar shinganapur information in Marathi) ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment