नागरिकशास्त्र माहिती मराठी | Civics information in marathi

Civics information in marathi:नागरिकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नागरिकशास्त्र होय.अगदी गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत संपूर्ण देशांची प्रशासन व्यवस्था कशी आहे,संपूर्ण देशांचा राज्यकारभार कसा जातो,स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे  काय,त्यांची कामे व अधिकार कोणते आहेत,पंचायत राज्य म्हणजे काय,समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असताना त्यांची काही हक्क अधिकार व कर्तव्य आहेत.

Civics information in marathi
नागरिकशास्त्र माहिती मराठी (Civics information in marathi)

नागरिकशास्त्र माहिती मराठी (Civics information in marathi)

त्याचप्रमाणे समाजामध्ये कोणतेही काम करत असताना जर आपल्या विरुद्ध अन्याय झाला असेल तर न्याय मिळवण्यासाठी आपण कोणत्या न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि त्यासाठी कोणकोणते कायदे अस्तित्व आहेत या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला नागरिकशास्त्रातून मिळत असते.ग्रामपंचायत पासून ते भारतीय संघराज्य प्रशासनापर्यंत अगदी सरपंचाची कामे कोणते आहेत पंचायत समिती सभापती असेल, जिल्हा परिषद जिल्हाध्यक्ष असेल त्या प्रत्येकाची माहिती आपल्याला नागरिक शास्त्रातून मिळत असते.

त्याचप्रमाणे आमदार असतील मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ असेल त्या मंत्रिमंडळामध्ये वेगळे विभाग असतील या सर्वांची कामे सर्वांची प्रशासन व्यवस्था कशी चालते हे आपल्याला नागरिक शास्त्रातून पाहावयास मिळते.देशाच्या पंतप्रधानाचे संपूर्ण मंत्रिमंडळ असेल त्यांची प्रशासन व्यवस्था असेल त्यांच्यामधील वेगवेगळे विभाग असेल या सर्वांची प्रशासन व्यवस्था,सर्वांची कामे,सर्वांचा अधिकार या सर्व गोष्टीची माहिती आपल्या नागरिकशास्त्रातून मिळत असते.

विधानसभा विधान परिषद लोकसभा आणि राज्यसभा या सर्वांची प्रशासन व्यवस्था सर्वांची कामे कोणत्याही प्रशासन व्यवस्था कशी चालते ते कोणकोणते काम करतात या सर्वांची माहिती आपल्याला या नागरिकशास्त्रातून मिळत असते.

हक्क व कर्तव्याची जाणीव

भारतीय संविधानाने देशातला प्रत्येक नागरिकांना हक्क,अधिकार,कर्तव्य,जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत.आधी गावाच्या सरपंच पासून देशांच्या राष्ट्रपती पर्यंत प्रत्येकांचे हक्क कोणत्याही अधिकार कोणत्याही कर्तव्य जबाबदाऱ्या कोणत्या आहेत याची माहिती आपल्याला नागरिकशास्त्रातून मिळत असते.

सुज्ञ नागरिक तयार करणे

नागरिकशास्त्रातून आपल्याला एक सुज्ञ आणि जबाबदार असणारा,संशोधन दृष्ट्या असणारा राष्ट्रप्रेमी, राष्ट्रभक्ती,कर्तव्यनिष्ठ असा एक जबाबदार नागरिक तयार करायचा आहे आणि हा जबाबदार नागरिक कसा असला पाहिजे याची माहिती आपल्याला नागरिकशास्त्रातून मिळत असते.

बलवान राष्ट्राची संकल्पना

आपले राष्ट्र एक बलवान राष्ट्र आहे आणि आपले राष्ट्र हे शक्तिमान राष्ट्र आहे.या बलवान राष्ट्राची संकल्पना साकार करण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकांनी ज्या वेळी देशासमोर समस्या निर्माण होतील, ज्या ज्यावेळी देशासमोर आव्हाने निर्माण होतील त्यावेळी देशाचा सर्व नागरिकांनी राष्ट्रांच्या बरोबर उभे राहणे गरजेचे आहे.

आणि देशाची सेवा करण्यासाठी देशाचा प्रत्येक नागरिक सदैव तत्पर असणे गरजेचे आहे तरच आपलं राष्ट्र एक बलवान राष्ट्र आणि एक सामर्थ्यवान राष्ट्र होईल या राष्ट्राची संकल्पना साकार करण्याची काम या देशाचा प्रत्येक नागरिकाच्या आहेत आणि त्या नागरिकाच्या नागरिक कसा असला पाहिजे याची माहिती आपल्या नागरिकशास्त्रातून मिळत असते.

नागरिकशास्त्राची व्याख्या

प्रत्येक व्यक्तीच्या जगण्यासाठी शास्त्रीयपणे केलेला अभ्यास म्हणजे नागरिकशास्त्र होय.

लोकशाही शासन पद्धती

आमचा देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही या मूल्यांचा स्वीकार आमच्या देशाला प्रत्येक नागरिकांनी केली आहे आणि म्हणून आमच्या देशाला संपूर्ण राज्यकारभार हा लोकशाही पद्धतीने चालत असतो.अगदी शाळेतला वर्ग प्रतिनिधी निवडण्यापासून ते प्रत्येक व्यक्तीची निवड ही आम्हाला लोकशाही पद्धतीने केलेले आहे.मग ते मोठे आमदार असतील खासदार असतील या सर्वांची निवड ही जनतेतून केलेली असते आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणून ती काम करत असतात.

जनतेचा सेवक, देशाचा सेवक म्हणून काम करत असतात.असा विद्यार्थी हा लोकशाही प्रधान किंवा लोकशाही मूल्यांची जपणूक करणारा, लोकशाहीचे संरक्षण करणारा असा विद्यार्थी तयार करण्याचे काम या नागरिकशास्त्रातून केले जात असते.नागरिकशास्त्रातून आपल्या देशाचा राज्यकारभार,प्रत्येक व्यक्तीची कामे कोणती या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला या नागरिक शास्त्रातून मिळत असते. 

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

नागरिकशास्त्र म्हणजे काय?

नागरिकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नागरिकशास्त्र होय.

सोप्या शब्दात नागरिकशास्त्र म्हणजे काय?

नागरिकत्वाच्या अभ्यासाला नागरिकशास्त्र म्हणतात. तुमची शाळा नागरिकशास्त्र वर्ग देत असल्यास, तुम्ही मतदान करणे आणि कर भरणे यासारख्या गोष्टींचे महत्त्व जाणून घेऊ शकता. विद्यार्थी सरकार तुम्हाला नागरिकशास्त्राबद्दल शिकवू शकते आणि त्याचप्रमाणे काही सामाजिक अभ्यासाचे धडे आणि वर्ग जे देशाचे नवीन नागरिक कधीकधी घेतात.

वर्ग 4 साठी नागरिकशास्त्र म्हणजे काय?

नागरिकशास्त्र म्हणजे मानवी हक्क आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्या, शासन आणि आपला समाज ज्या वातावरणात आढळतो त्याचा अभ्यास आहे.

नागरिकशास्त्राचे पूर्ण रूप काय आहे?

नागरीकशास्त्र म्हणजे समाजातील नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये यांचा अभ्यास . हा शब्द लॅटिन शब्द civicus पासून आला आहे, ज्याचा अर्थ “नागरिकांशी संबंधित” आहे.

नागरिकशास्त्राचे संस्थापक कोण आहेत?

बेंजामिन फ्रँकलिन हे नागरिकशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण नागरिकशास्त्र माहिती मराठी (Civics information in marathi) जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment