सोशॉलॉजी अर्थ मराठी|sociology meaning in marathi

sociology meaning in marathi:समाजशास्त्र हा जो मराठी शब्द आहे हा इंग्रजी शब्द सोशॉलॉजी (sociology) या शब्दाचे भाषांतर आहे. आणि इंग्रजी शब्द सोशॉलॉजी (sociology) हा शब्द दोन भाषांच्या मिश्रणांनी बनलेला आहे.लॅटिन भाषेतील (socious) सोषीयस आणि ग्रीक भाषेतील लॉगोस (logos).लॅटिन भाषेतील (socious) सोषीयस या शब्दाचा अर्थ होतो समाज आणि ग्रीक भाषेतील (logos) लॉगोस या शब्दाचा अर्थ होतो शास्त्र. म्हणजेच समाजाचे शास्त्र समाजशास्त्र.

sociology meaning in marathi
सोशॉलॉजी अर्थ मराठी(sociology meaning in marathi)

सोशॉलॉजी अर्थ मराठी(sociology meaning in marathi)

नमस्कर मित्रांनो आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत समाजशास्त्राचा अर्थ(meaning of sociology) आणि समाजशास्त्राची व्याख्या(definition of sociology).समाजशास्त्राचा अर्थ उत्पत्तीच्या माध्यमातून व व्याख्यांच्या माध्यमातून अश्या दोन प्रकारे जाणून घेता येतो.

समाजशास्त्राचा उत्पत्तीच्या माध्यमातून अर्थ

फ्रेंच विचारवंत ऑगस्त कॉम्प्त यांनी सर्वप्रथम त्यांच्या कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथामध्ये सोशॉलॉजी (sociology) हा शब्द सर्वप्रथम वापरला होता.फ्रेंच विचारवंत ऑगस्त कॉम्प्त यांनी आग्रही प्रतिपादन मांडले होते की ज्याप्रकारे

भौतिकशास्त्रात,रसायनशास्त्रात वैज्ञानिक अभ्यास पद्धतीचा,शास्त्रीय अभ्यास पद्धतीचा उपयोग केला जातो त्याचप्रकारे समाजाचा अभ्यास सुद्धा वैज्ञानिक अभ्यास पद्धती,शास्त्रीय अभ्यास पद्धतीने केला जावा म्हणून त्यांनी या संपूर्ण विषयाला सोशियोलॉजी या विषयाला सोशल फिजिक्स (social physics) सामाजिक भौतिकशास्त्र असे नाव दिले होते.

परंतु अँडॉफ क्विंटलेट या बेल्जियम विचारवंतांनी त्यांच्या एका निबंधाला (an essay of social physics) असे नाव दिले होते म्हणून ऑगस्त कॉम्प्त हे नाराज होते याचमुळे ऑगस्त कॉम्प्त हे आपल्या विषयाला  सामाजिक भौतिकशास्त्र (social physics) हे नाव देऊ शकले नाहीत.ऑगस्त कॉम्प्त हे आपल्या विषयाला सामाजिक भौतिकशास्त्र हे नाव देऊ शकले नाहीत म्हणून समाजशास्त्र (sociology) हे नाव दिले.

समाजाचा अभ्यास शास्त्रीय अभ्यास पद्धतीप्रमाणे केला पाहिजे,वैज्ञानिक अभ्यास पद्धतीप्रमाणे केला पाहिजे असे प्रतिपादन मांडल्यामुळे आणि समाजशास्त्र (sociology) हा शब्द कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथामध्ये सर्वप्रथम वापरल्यामुळे  ऑगस्त कॉम्प्त यांना समाजशास्त्राचे जनक मानले जाते. सोशॉलॉजी  (sociology) हा शब्द 1837 मध्ये फ्रेंच विचारवंत ऑगस्त कॉम्प्त यांनी सर्वप्रथम त्यांच्या कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथामध्ये वापरला.

व्याख्यांच्या माध्यमातून समाजशास्त्राचा अर्थ

ऑगस्त कॉम्प्त

समाजशास्त्र हे प्रामुख्याने सामाजिक व्यवस्था व प्रगतीचे शास्त्र आहे.

मॅक्स वेबर

सामाजिक क्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र.

हॅरी जॉन्सन

सामाजिक समूहांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच समाजशास्त्र.

एमिल दुर्खीम 

सामाजिक तथ्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र.

मॅक आयव्हर व पेच

सामाजिक संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र.

सोशॉलॉजी हा शब्द प्रथम कोणी वापरला?

सोशॉलॉजी  (sociology) हा शब्द 1837 मध्ये फ्रेंच विचारवंत ऑगस्त कॉम्प्त यांनी सर्वप्रथम त्यांच्या कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथामध्ये वापरला.

समाजशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

ऑगस्त कॉम्प्त यांना समाजशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते.

पहिले भारतीय समाजशास्त्रज्ञ कोण आहेत?

गोविंद सदाशिव घुर्ये

पहिले भारतीय समाजशास्त्रज्ञ कोण होते?

हायगेट येथील इंडिया हाऊस संस्थेचे संस्थापक श्यामाजी कृष्णवर्मा यांनी जानेवारी 1905 मध्ये द इंडियन सोशियोलॉजिस्टची निर्मिती आणि संपादन करण्यास सुरुवात केली. द इंडियन सोशियोलॉजिस्टचे उपशीर्षक ‘स्वातंत्र्य, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचे एक अंग’ असे होते.

भारतीय समाजशास्त्रीय सोसायटीची स्थापना कोणी केली?

बॉम्बे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. जी.एस. घुर्ये यांच्या पुढाकाराने बॉम्बे येथे इंडियन सोशिऑलॉजिकल सोसायटीची स्थापना करण्यात आली. सोसायटी नोंदणी कायद्यांतर्गत डिसेंबर 1951 मध्ये सोसायटीची नोंदणी झाली. जीएस घुर्ये हे संस्थापक अध्यक्ष होते.

भारतातील समाजशास्त्राची ऐतिहासिक मुळे काय आहेत?

एकीकडे पाश्चिमात्य विद्वानांच्या वसाहतवादी हितसंबंध आणि बौद्धिक कुतूहल आणि दुसरीकडे भारतीय विद्वानांच्या प्रतिक्रियांमध्ये समाजशास्त्राचा विकास झाला. ब्रिटिश अधिकार्‍यांना भारतीय समाजातील चालीरीती, चालीरीती आणि संस्थांचे ज्ञान आवश्यक होते.

समाजशास्त्राचे शास्त्र काय आहे?

समाजशास्त्र, एक सामाजिक विज्ञान जे मानवी समाज, त्यांचे परस्परसंवाद आणि त्यांचे जतन आणि बदल करणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास करते . हे संस्था, समुदाय, लोकसंख्या आणि लिंग, वांशिक किंवा वयोगट यासारख्या समाजाच्या घटक भागांच्या गतिशीलतेचे परीक्षण करून करते.

शैक्षणिक समाजशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते?

शिक्षणाच्या पद्धतशीर समाजशास्त्राची सुरुवात एमिल डर्कहेम (1858-1917) यांनी नैतिक शिक्षणावर सेंद्रिय एकतेचा आधार म्हणून केली आणि मॅक्स वेबर (1864-1920) यांनी चिनी साहित्यावर राजकीय नियंत्रणाचे साधन म्हणून केलेल्या अभ्यासाने झाली.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण  समाजशास्त्राचा त्याच्या उत्पत्तीच्या माध्यमातून आणि व्याख्यांच्या माध्यमातून अर्थ बघितला आहे.ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

सोशॉलॉजी अर्थ मराठी(sociology meaning in marathi)

Leave a Comment