मुंबई पर्यटन स्थळे | Tourist places Of Mumbai In Marathi

Tourist places Of Mumbai In Marathi : पुर्वीचे बॉम्बे आणि सध्याचे मुंबई शहर हे भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे.मुंबई शहराची ओळख ही स्वप्नांचे शहर अशी आहे ज्या ठिकाणी देश विदेशातून पर्यटक मोठ्या उत्सुकतेने येत असतात.मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे आणि या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे आहेत मुंबईत समुद्रकिनाऱ्या पासून बॉलिवूड पर्यंत संग्रहालय आणि नैसर्गिक उद्यानापासून धार्मिक स्थळांपर्यंत अनेक सुंदर ठिकाणी आहेत.

Tourist places Of Mumbai In Marathi
मुंबई पर्यटन स्थळे (Tourist places Of Mumbai In Marathi)

या शहरांमध्ये असणाऱ्या जागतिक वास्तुकाला आधुनिक उंच-उंच इमारती सांस्कृतिक आणि पारंपारिक संरचना व झोपडपट्ट्या याला वेगळेपणा देतात.हिवाळा म्हणजेच नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी या शहराला भेट देण्यासाठी अगदी योग्य समाजाला जातो.आज आपण मुंबई शहरातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मुंबई पर्यटन स्थळे (Tourist places Of Mumbai In Marathi)

मुंबई पर्यटन स्थळे (Tourist places Of Mumbai In Marathi)

1. गेटवे ऑफ इंडिया

गेटवे ऑफ इंडिया हे ठिकाण कुटुंबासमवेत आणि मित्रांनबरोबर भेट देण्यासाठी एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.पाचवा राज्या जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या मुंबई भेटीच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडियाची उभारणी जॉर्ज विलेत यांनी 1924 मध्ये केली होती.गेटवे ऑफ इंडिया वरून आपण विशाल समुद्राला बोटीतून भेट देऊ शकतो त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेले ताजमहाल हॉटेल बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असते.गेटवे ऑफ इंडिया ला भेट देण्यासाठी दररोज हजारो पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून गेटवे ऑफ इंडिया हे ठिकाण 4 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

2. जुहू बीच

मुंबई हे शहर समुद्रकिनाऱ्यावर बसलेले आहे मुंबईतील समुद्र किनारे हे पर्यटनासाठी अगदी उत्तम ठिकाणी आहेत त्यापैकी एक म्हणजे जुहू बीच.या ठिकाणी आपण बसून सूर्यास्ताचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो. जुहू बीच हे ठिकाण मुंबईतील सर्वात व्यस्त समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे ज्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.हा समुद्रकिनारा तब्बल 6 किलोमीटर लांबीचा आहे ज्या ठिकाणी आपण बनाना राइड्स,जेंट्स की आणि बंपर राइड्स यासारख्या जलक्रीडा खेळात सहभागी होऊ शकतो.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून जुहूबीच हे ठिकाण 21 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

3. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे.हे 104 चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रावर पसरलेले आहे.हे उद्यान बोरिवली पूर्व मुंबई या ठिकाणी स्थित आहे.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला मुंबई शहराचे फुफ्फुस असे म्हटले जाते कारण हे शहर परिसरात असलेले जगातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे.पर्यावरणीय पर्यटना चालना देण्यासाठी आणि संरक्षित जंगल व रोमांचक सफारीसाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे.या उद्यानात आपल्याला बिबट्या,चारशिंगी हरण,काळवीट,सांबर,वानर,माकड इत्यादी प्राणी पाहायला मिळतात.त्याचबरोबर या उद्यानात वनस्पतीच्या एक हजार पेक्षा जास्त प्रजाती सस्तन प्राण्यांच्या 40 पेक्षा जास्त प्रजाती आणि पक्षीही आढळून येतात.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे 29 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

4. सिद्धिविनायक मंदिर

सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे जे मुंबईमध्ये भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.हे मंदिर मुंबई शहरातील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखले जाते.या ठिकाणी असणाऱ्या श्री गणेशाच्या मूर्तीची सोंड ही उजवीकडे वाकलेली आहे.असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाचा महिमा हा अमर्याद आहे जो आपल्या भक्तांच्या मनोकामना लगेच पूर्ण करतो.जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त मोठ्या उत्सुकतेने या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात.सिद्धिविनायक गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात चित्रपट कलाकार आलेले पाहायला मिळतात.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून सिद्धिविनायक मंदिर हे 14 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

5. रेड कार्पेट वॅक्स म्युझियम

रेड कार्पेट वॅक्स म्युझियम हे मुंबईतील उत्कृष्ट आणि प्रसिद्ध मेन संग्रहालयांपैकी एक आहे.या ठिकाणी 40 पेक्षा जास्त मेणाचे पुतळे आहेत.या म्युझियम मध्ये आपल्याला बाळासाहेब ठाकरे,महात्मा गांधी,मिस्टर बीन,मायकल जॅक्सन,हरी पॉटर,जेम्स बॉण्ड,बिल गेट्स,सलमान खान,शाहरुख खान इत्यादींची मेणाचे पुतळे पाहायला मिळतील.आपल्या आवडत्या स्टार बरोबर सेल्फी घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी या ठिकाणी बरेच पर्यटक येत असतात.रेड कार्पेट वॅक्स म्युझियम हे ठिकाण अमृत नगर घाटकोपर पश्चिम मुंबई या ठिकाणी स्थित आहे जे सकाळी 9 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत सुरू असते.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून रेड कार्पेट वॅक्स म्युझियम हे ठिकाण 23 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

6. हाजी आली

हाजी अली दर्गा हे मुंबईतील एक प्रसिद्ध ठिकाण आहे जे समुद्राच्या मध्यभागी तरंगणारे सर्व धर्माचे लोक भेट दिले जाणारे धार्मिक ठिकाण आहे.ही दर्गा 19 व्या शतकात बांधण्यात आली यात पंधराव्या शतकातील सुपी संत पीर हाजी अली शहा भुकारी यांची कबर आणि अवशेष आहेत.पांढऱ्या रंगाच्या दगडांनी बनवलेली ही इमारत इंडो इस्लामिक स्थापत्य कलेचे सुंदर उदाहरण आहे.मुंबईमध्ये कुटुंबासह भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे.या दर्गाला आपण दररोज सकाळी 5.30 ते सायंकाळी 10.00 वाजेपर्यंत भेट देऊ शकतो.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून हाजी अली दर्गा हे ठिकाण 7.5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

7. वीर माता जिजाबाई भोसले उद्यान

वीर माता जिजाबाई भोसले उद्यान उर्फ राणी बगीचा हा मुंबईतील सर्वात जुना आणि मोठा बगीचा आहे जो तब्बल 53 एकर इतक्या मोठ्या परिसरात विस्तारलेला आहे.या उद्यानात झाडे झुडपे आणि शंभरी ओलांडलेले अनेक मोठमोठे वृक्ष आहेत.याशिवाय या ठिकाणी अनेक सस्तन प्राणी ल,पक्षी आणि कीटक वास्तव्यास आहेत येथे आपल्याला हत्ती,पानघोडेा,वाघ,बिबट्या,मगर आणि अजगर यासारखे प्राणी पाहायला मिळतील.कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी वीर माता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय हे एक उत्तम ठिकाण आहे.हे उद्यान भायकाळापूर्व माजगाव मुंबई या ठिकाणी स्थित आहे जे बुधवार सोडून सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सुरू असते.

8. नेहरू तारांगण

नेहरू तारांगण हे मुंबईतील एक प्रसिद्ध ठिकाण आहे जे नेहरू सायन्स सेंटरचा एक भाग आहे ज्याची स्थापना 1977 मध्ये वरळी येथे करण्यात आली.या ठिकाणी विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अंतराळ केंद्र विश्वाविषयी शिक्षण दिले जाते.नेहरू केंद्र संकुलनात विविध प्रदर्शने दालन आणि सभागृह आहेत.सर्वात मनोरंजक विभागापैकी एक म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडियाचे ऐतिहासिक घटना आणि वास्तुशास्त्र द्वारे भारतातील बदलांचे स्पष्टीकरण देतो.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून नेहरू तारांगण हे ठिकाण 8.5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

9.आर बी आय मॉनिटरी म्युझियम

आर बी आय मॉनिटरी म्युझियम म्हणजेच आर बी आय मुद्रा संग्रहालय हे मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे.हे ठिकाण सांस्कृतिक दृष्ट्या जितके समृद्ध आहे तितकेच ते ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे.भारतीय चलनाच्या सध्या आणि इतिहासाची संबंधित काही रोचक तत्वे या ठिकाणी आपल्याला जाणून घेता येतील.या ठिकाणी भारतातील सर्वात जुनी वस्तुविनिमय प्रणाली आहे.या ठिकाणी कागदाचे पैसे नाणी स्टॉक मार्केट मधील वापर आधुनिक इलेक्ट्रॉनिक व्यवहारापर्यंतच्या घडामोडींना कव्हर केलेले आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून आरबीआय मॉनिटरी म्युझियम हे ठिकाण 3.2 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

10. मरीन ड्राईव्ह

मुंबई शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये मरीन ड्राईव्ह या ठिकाणाचे नाव मोठ्या उत्सुकतेने घेतले जाते.मरीन ड्राईव्ह हा मुंबईतील एक रस्ता आहे जो नरिमन पॉईंट ला सुरू होऊन गिरगांव चौपाटी मध्ये संपतो.जो अगदी समुद्रा लगत असल्यामुळे अगदी सुंदर आणि आकर्षक दिसतो.मरीन ड्राईव्ह या ठिकाणाला क्वीन्स नेकलेस म्हणूनही ओळखले जाते कारण या ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दिवे हे मोत्याप्रमाणे चमकतात.हे ठिकाण खास करून आराम करण्यासाठी आणि संध्याकाळच्या वेळेस काही रोमँटिक क्षण घालवण्यासाठी एक उत्तम जागा आहे.मरीन ड्राईव्ह हे ठिकाण नेताजी सुभाष चंद्र बोस रोडवर आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून मरीन ड्राईव्ह हे ठिकाण मात्र 2.5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण मुंबई पर्यटन स्थळे (Tourist places Of Mumbai In Marathi) ही माहिती जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment