शनिवारवाडा माहिती मराठी | Shanivarvada Information In Marathi

Shanivarvada Information In Marathi : शनिवार वाडा हे ठिकाण पुण्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे.शनिवार वाडा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक ऐतिहासिक पर्यटन स्थानांपैकी एक आहे.पूर्वीच्या काळात मराठाशाही वस्तू कलेचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून शनिवार वाड्याकडे पाहिले जाते.भारत सरकारने या वाड्याला 17 जून 1919 मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहास प्रेमी आवर्जून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात.शनिवारवाडा हे ठिकाण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे या शहरांमध्ये स्थित आहे पुण्यातील एक प्रमुख राजवाडा म्हणून शनिवार वाड्याकडे पाहिले जाते.

Shanivarvada Information In Marathi
शनिवारवाडा माहिती मराठी (Shanivarvada Information In Marathi)

शनिवारवाडा माहिती मराठी (Shanivarvada Information In Marathi)

अठराव्या शतकात म्हणजेच इसवी सन 1732 मध्ये पहिला बाजीराव यांनी हा राजवाडा बांधला.हा राजवाडा बांधण्यासाठी संपूर्ण दगडाचा वापर करण्यात आला आहे असे मानले जाते.असे म्हटले जाते की या राजवाड्याचे काम सुरू होण्याचा दिवस आणि काम पूर्ण होण्यासाठी दिवस हा शनिवारच होता म्हणूनच याला शनिवार वाडा असे नाव देण्यात आले आहे.शनिवार वाड्याच्या भिंती या 21 फूट उंच आणि राजवाड्याच्या तटबंदी साधारणतः 950 फूट लांब आहेत.शनिवार वाड्याला दिल्ली दरवाजा,मस्तानी दरवाजा,खिडकी दरवाजा,गणेश दरवाजा,नाटक शाळा किंवा जांभूळ दरवाजा असे एकूण पाच दरवाजे आणि नऊ बुरुज आहेत.हे पाचही दरवाजे आज देखील अगदी भक्कम स्थितीत उभा आहेत.

मुख्य दरवाजा ज्याला आपण दिल्ली दरवाजा म्हणून ही ओळखतो तो हा दरवाजा इतका मोठा आहे की या दरवाज्यातून हत्ती देखील अगदी सहज जाऊ शकतो.शत्रूची आक्रमण रोखण्यासाठी या दरवाजावर लोखंडी खिळे देखील बसवलेले आहेत.त्याचबरोबर शनिवार वाड्याच्या आत मध्ये आपल्याला मुगल स्थापत्य शैलीचे दर्शन घडवणारे फुलांची कोरीव काम आणि भीती चित्र देखील पाहायला मिळतात. त्याचबरोबर असे देखील म्हटले जाते की या किल्ल्यामध्ये नारायणराव यांना त्यांची चुलती आणि चुलत्याने वय वर्षी 18 मध्ये मारले होते,तेव्हापासूनच या किल्ल्यामध्ये नारायण राव यांची आत्मा राहते असे काही लोकांचे म्हणणे आहे.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार असे देखील म्हटले जाते की संध्याकाळच्या वेळेस या किल्ल्यातून वाचवा वाचवा अशी भयंकर आवाज येतात.शनिवार वाडा हा किल्ला पाहण्यासाठी सकाळी 8 ते सायंकाळी 6.30 पर्यंत खुला असतो.पुण्यातील स्वारगेट या बस स्थानकापासून हा किल्ला मात्र 3.5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

शनिवार वाडा पुणे

पहिले बाजीराव पेशवे यांनी बांधलेला पेशव्यांचा वाडा म्हणजे शनिवार वाडा.सन 1736 मध्ये बांधलेला हा वाडा पेशव्यांचे प्रमुख ठिकाण होते.आज देखील शनिवार वाडा पुण्याच्या संस्कृतीचे केंद्र मानले जाते.शनिवार वाड्याचा रचनेनुसार मुख्य प्रवेशद्वाराला दिल्ली दरवाजा असे आहे तर इतर चार दरवाजे गणेश,मस्तानी, जांभूळ आणि खिडकी या नावाने ओळखले जातात.दिल्ली दरवाजाची उंची 21 फूट असून तो 14 फूट रुंद आहे. त्यावरील नगार खाण्यावरून संपूर्ण शनिवार वाड्याचे दर्शन होते.

स्थानपुणे ,महाराष्ट्र 
निर्माण1746
वास्तुशैलीमराठी
शनिवारवाडा माहिती मराठी (Shanivarvada Information In Marathi)

शनिवार वाड्याची मुख्य इमारत सहा मजली होती. ज्यामध्ये गणपतीचा रंग महाल,नानांचा दिवाणखाना, जुना आणि नवा आरसेमहाल, आस्मानी महाल, नारायणरावांचा महाल, दादासाहेबांचा दिवाणखाना इत्यादी होते. याचबरोबर नारायणरावांचे,दादासाहेबांचे आणि रावसाहेबांचे देवघर देखील होते जे आता अस्तित्वात नाही.वाड्यातील देवडीच्या भिंतीवर विष्णू,गणपती यांची चित्रे रेखाटली होती जी आता काळाच्या ओघात नामशेष झाली आहेत.शनिवार वाड्यात ऑगस्ट 1773 मध्ये नारायणराव पेशवे यांचे काका रघुनाथराव पेशवे आणि काकू आनंदीबाई यांच्या आज्ञेवरून सुमेर सिंह गर्दी आणि काही अंगरक्षकांनी नारायणराव पेशवे यांची हत्या केल्याचा इतिहास आहे.शनिवारवाडा माहिती मराठी (Shanivarvada Information In Marathi)

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

शनिवार वाडा कोणी बांधला ?

पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली शनिवार वाडा बांधला.

शनिवार वाडा रहस्य काय आहे ?

असे देखील म्हटले जाते की या किल्ल्यामध्ये नारायणराव यांना त्यांची चुलती आणि चुलत्याने वय वर्षी 18 मध्ये मारले होते.

शनिवार वाडा कुठे आहे ?

शनिवार वाडा हे ठिकाण महाराष्ट्रातील पुणे शहरातील एक एतिहासिक पर्यटन स्थळ आहे.

रघुनाथराव पेशवे कोण आहेत?

हे 1773 ते 1774 या कालावधीसाठी मराठा साम्राज्याचे 11 वे पेशवे होते.

पेशवाईचा संस्थापक कोण आहेत ?

मराठा साम्राज्याचा जनक असलेल्या शिवाजी महाराज, त्यांच्या इ. स. १६७४मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना नेमले. असे असले तरीही सोनोपंत डबीर हे पहिला पेशवा असल्याचे मानले जाते.

पेशवाई कधी संपुष्टात आली ?

पेशवाईचा अस्त १८१८ साली झाला, असं साधारणपणे आपण समजतो.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण शनिवारवाडा माहिती मराठी (Shanivarvada Information In Marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment