क्रियापद माहिती मराठी | kriypad in marathi

kriypad in marathi : क्रियापद म्हणजे धातूला प्रत्यय लागून क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करीत असतील तर त्यांना क्रियापद असे म्हणतात.

क्रियापद माहिती मराठी (kriypad in marathi)

 • उदाहरणार्थ
 • जेव + तो = जेवतो
 • दे + ने =देणे
 • कर + ने = करणे

तर जेवतो, देणे, करणे हे क्रियायापद आहे. नंतर क्रियापदातील प्रत्येरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात.

उदाहरणार्थ जेव, दे, कर हे सर्व धातू आहे. धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण न करता येणाऱ्या शब्दांना धातू साधित किंवा कृदंते असे म्हणतात.

उदाहरणार्थ

त्याचे वागणे, वाघ मला आवडले नाही, खुर्चीवर बसून बस तो बोलला, वाघ व बस ही धातू साधिते किंवा कृदंत होय.

kriypad in marathi
kriypad in marathi

क्रियापदाचे पुढील प्रमाणे सात प्रकार पडतात

 • सकर्मक क्रियापद
 • अकर्मक क्रियापद
 • संयुक्त क्रियापद
 • साधित क्रियापद
 • प्रयोजक क्रियापद
 • शक्य क्रियापद
 • भावकर्तु क्रीयपद

सकर्मक क्रियापद

सकर्मक क्रियापद म्हणजे ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची आवश्यकता असते त्या सकर्मक क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ

सुशांतने आंबा खाल्ला या वाक्याला पूर्ण अर्थ आहे. जर सुशांतने खाल्ला एवढेच वाक्य दिले असते तर त्याचा अर्थ पूर्ण झाला नसता म्हणून आंबा या कर्माची आवश्यकता आहे. व म्हणूनच खाल्ला आहे सकर्मक क्रियापद होय.

अकर्मक क्रियापद

अकर्मक क्रियापद म्हणजे ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची आवश्यक नसते त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ

अमोल रस्त्यात हसतो. अमोल हसतो त्यालाही अर्थपूर्ण आहे. हसतो या क्रियापदाला कर्माची आवश्यकता नाही. म्हणून हसतो हे अकर्मक क्रियापद होय.

सहायक क्रियापद

सहायक क्रियापद वाक्यातील मुख्य क्रिया दाखवणाऱ्या शब्दाच्या रूपाला जोडून दुसरी क्रियापदे ते त्या सहाय्यक क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ

आम्ही जेवत आहोत, तू चेंडू घेऊन जा. यामध्ये आहो, जा ही सहाय्यक क्रियापदे होई. तर मुख्य क्रियापद दाखवणाऱ्या या शब्दाचे रूप व सहाय्यक क्रियापद या दोन्हीला मिळून होणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात.

साधीत क्रियापद

सादिक क्रियापद म्हणजे नाम, विशेषण, क्रियापद, अव्यय यांना प्रत्यय लागून बनलेल्या क्रियापदांना साधित क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ
हाताळणे हात या नामाला प्रत्यय. स्थिरावला स्थिर या विशेषणाला प्रत्यय. पूढावली पुढे या अव्ययाला प्रत्येय.

प्रायोजक क्रियापद

प्रायोजक क्रियापद म्हणजे जेव्हा करता एखादी क्रिया स्वतः न करता दुसऱ्याकडून करून घेतो किंवा दुसऱ्या कोणाला करावयास सांगतो. तेव्हा ती क्रिया दर्शविणारा क्रियापदाला प्रायोजक क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ
आई बाळाला खेळवते, सुरेखाने बहिणीला रडवले. खेळवते व रडवले हे प्रायोजक क्रियापद होय.

शक्य क्रियापद

शक्य क्रियापद म्हणजे ज्या क्रियापदावरून कार्यशासंदर्भात शक्यता आणि सामर्थ्य यामधील बोध होतो. तेव्हा त्या क्रियापदाला शक्य क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ

आज आजोबांना चालवते, आजारानंतर आता मला खेळवते, त्याला आता बसविते, चालविते, खेळते व बसविते हे शक्य क्रियापद होय.

भावकर्तु क्रियापद

भावकर्तु क्रियापद म्हणजे शब्दाच्या क्रियेतील मूळ अर्थ म्हणजे भाव तोच त्याचा करता मानावा लागतो. त्याची करते वाक्यात स्वतंत्रपणे दिसत नाही. अशा क्रियापदांना भावपूर्ण असे म्हणतात.

उदाहरणार्थ

मला घरी जाण्यापूर्वी सांजवले, सांज झाली हा अर्थ. पित्त झाल्यामुळे त्याला आत मळमळते, मळमळ होत आहे असा अर्थ

क्रियापद म्हणजे काय ?

क्रियापद म्हणजे धातूला प्रत्यय लागून क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करीत असतील तर त्यांना क्रियापद असे म्हणतात.

क्रियापदाचे किती प्रकार पडतात ?

क्रियापदाचे पुढील प्रमाणे सात प्रकार पडतात
सकर्मक क्रियापद
अकर्मक क्रियाप
दसंयुक्त क्रियापद
साधित क्रियापद
प्रयोजक क्रियापद
शक्य क्रियापद
भावकर्तु क्रीयपद

निष्कर्ष (summary)

आजच्या या पोस्ट मध्ये आपण क्रियापद माहिती मराठी (kriypad in marathi) ही माहिती बघितली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment