विशाळगड किल्ला माहिती मराठी | vishalgad fort information in marathi

vishalgad fort information in marathi: विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्य दिशेला 76  किलोमीटर अंतरावर बसलेला आहे. सह्याद्री डोंगररांगा आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर विशाळगड किल्ला उभा आहे. हा किल्ला नावाप्रमाणेच विशाल असून या किल्ल्याची उंची 1130 मिटर आहे. विशाळगड किल्ला हा गिरीदुर्ग या प्रकारात येत असून या किल्ल्याची चढायची श्रेणी ही अगदी सोप्या पद्धतीची आहे. विशाळगड या किल्ल्याचे ठिकाण हे भारतात महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे.

vishalgad fort information in marathi
विशाळगड किल्ला माहिती मराठी (vishalgad fort information in marathi)

विशाळगड किल्ला माहिती मराठी (vishalgad fort information in marathi)

नावविशाळगड किल्ला
उंची1130 मीटर
प्रकार गिरीदुर्ग
जिल्हाकोल्हापूर
डोंगररांगासह्याद्री
विशाळगड किल्ला माहिती मराठी (vishalgad fort information in marathi)

विशाळगड हा किल्ला बाजीप्रभू देशपांडे आणि सिद्धी जोहार यांच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी किल्ल्याचे बांधकाम आणि दुरुस्ती करण्यासाठी 5000 हून खर्च केले.विशाळगड हा किल्ला पुणे शहरापासून 252 किलोमीटर अंतरावर आहे तर मुंबई शहरापासून 394 किलोमीटर येवढ्या अंतरावर आहे.

 कोल्हापूर शहरापासून जवळच असलेल्या या किल्ल्याशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा आहे. त्यामुळे मराठा आणि महाराष्ट्राच्या इतिहासात तसेच भारताच्या इतिहासात विशालगड किल्ल्याचे महत्त्वाचे स्थान आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे. विशालगड हा गिरीदुर्ग किल्ला आहे. म्हणजेच हा किल्ला डोंगरावर बांधलेला किल्ला आहे.विशाळगड हा किल्ला एकेकाळी हिंदवी स्वराज्याची राजधानी होती. आणि या किल्ल्यानं आपल्या आयुष्यात अनेक लढायाही पाहिल्या आहेत.

विशाळगड किल्ल्याचा इतिहास

विशाळगडाची उभारणी इसवी सन 1058 मध्ये शिलाहार राजा मारसिंह यांनी केली. हा गड किल्ला खेळणा या नावाने देखील ओळखला जातो. साधारण इसवी सन 1453 च्या सुमारास बाहामणी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला. हा सरदार म्हणजे मलिक उत्तुजार. शिर्केयांना मलिक उत्तुजार याला विशालगडा ची आमीज दाखवली. शिर्केयांच्या मार्गदर्शनाखाली मलिक उत्तुजारची 7000 ची फौज निबीड अरण्यात येऊन दाखल झाली.

अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्य सकट मलिक उत्तुजार ला आणल्यावर विशाळ गडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेला मलिक उत्तुजारला त्यांच्या 7000 सैन्या सकट त्यांचा आक्रमणातून मुक्त केले. या सैन्यातील एक सरदार मलिक रयहांत होता. त्याचीच कब्र विशाळगडावर आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.

पुढे शिवाजी महाराजांनी इसवी सन 1659 मध्ये हा किल्ला जिंकला व याला विशाळगड असे नाव ठेवले. आदिलशाहीत सरदार सिद्दी जोहर यांनी टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून शिवाजी राजांनी करून घेतलेल्या सुटकेमुळे या किल्ल्याचे नाव अजरामर झाले आहे. पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी बराचसा काळ व्यतीत केला.

त्यांनी या किल्ल्याच्या पुनर्बांधणीकडे लक्ष दिले. मराठा इतिहासात विशालगडाशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा आहे, ज्याला पावनखिंडची लढाई म्हणून ओळखले जाते. बाजीप्रभू देशपांडे यांनी 300 मावळ्यांसह पन्हाळा ते विशाळगढला जाताना हजारोंच्या मुघल सैन्याशी लढा दिला आणि शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी प्राणाची आहुती दिली.

विशाळगडावरील पाहण्यासारखे ठिकाने

वाहन तळावरून गडाकडे जाण्यासाठी एकच वाट आहे. वाटेवरील लोखंडी फुल ओलांडल्यानंतर पायऱ्यांची चढण सुरू होते. चढताना ढासळलेले बुरुज दिसतात. साधारण 30 मिनिटे चालल्यानंतर गडाच्या सपाटीवर येऊन पोहोचतो. गडावर हजरत मलिक रेहान यांचा दर्गा आहे. दरवर्षी येथे हजारो भाविक भेट देतात. याशिवाय गडावर वीर रत्न बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे.

अवघ्या काळाच्या अवगत किल्ल्याची बरीच पडझड झाली असून सध्या गडावर कोणतीही अवशेष नाहीत. किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई यांचे स्मारक आहे. 

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

विशाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

विशाळगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

विशाळगड हा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?

विशाळगड हा किल्ला शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे आहे.

विशाळगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

विशाळगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव हे खेळणा किल्ला असे होतो.

पन्हाळा ते पावनखिंड अंतर किती आहे ?

पन्हाळा ते पावनखिंड चे अंतर 51 किलोमीटर आहे.

पन्हाळागड ते विशाळगड चे अंतर किती आहे ?

पन्हाळागड ते विशाळगड चे अंतर 64 किलोमीटर इतके आहे.

विशाळगड हा किल्ला कोणत्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे ?

विशाळगड हा किल्ला बाजीप्रभू देशपांडे आणि सिद्धी जोहार यांच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण विशाळगड किल्ला माहिती मराठी ( vishalggad Fort Information Marathi) जाणून घेतली. तुम्हाला विशाळगड किल्ला माहिती मराठी (vishalgad Fort Information Marathi) ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment