जगातील सर्वात लांब नद्या माहिती मराठी | Longest rivers in the world

Longest rivers in the world : मित्रानो पाण्याविना जीवन अशक्य आहे. आणि हेच पाणी आपल्याला वेगवेगळ्या स्त्रोतामधून मिळते. त्यातील सर्वात महत्वाचा स्त्रोत म्हणजे नदी. जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक नद्या आहेत. आजच्या या लेखामध्ये आपण जगातील सर्वात लांब नद्या माहिती मराठी (Longest rivers in the world in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Longest rivers in the world in Marathi
जगातील सर्वात लांब नद्या (Longest rivers in the world in Marathi)

Contents

जगातील सर्वात लांब नद्या (Longest rivers in the world in Marathi)

  • नाईल नदी
  • ॲमेझॉन नदी
  • यागत्से नदी
  • मिसीसिपी नदी
  • येनिसे

जगातील सर्वात लांब नद्या माहिती मराठी (Longest rivers in the world in Marathi)

नाईल नदी

जगातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाची नदी आहे ती नाईल नदी. ही आफ्रिका खंडातील प्रमुख नदी आहे सुमारे 6650 किलोमीटर म्हणजेच 4130 मईल इतकी लांबी असलेल्या नदीला जगातील सर्वात लांब नदी मानण्यात आलेले आहे. या नदीचा सरासरी प्रवाह अस्वाल शहर शेजारी 2830 घन मीटर पर सेकंद म्हणजेच एक लाख घनफूट पर सेकंद इतकी आहे. तर कैरो शहारा शेजारी चौदाशे घनमीटर पर सेकंद म्हणजेच 49 हजार घनफूट पर सेकंद इतका प्रवाह आहे.

या नदीच्या उगम स्थानाची समुद्रसपाटी पासूनची उंची सुमारे दोन हजार मीटर म्हणजेच 6600 फूट आहे. पांढरी नाईल आणि निळी नाईल या दोन नाईलच्या प्रमुख उपनद्या आहेत. पांढऱ्या नाईल चा उगम विक्टोरिया सरोवर मध्ये होतो. तर निळ्या नाईल चा उगम इथोपिया मधील ताना सरोवरात होतो. सुदाम मधील खार्टुम शहराजवळ या दोन नद्यांचा संगम होतो. व पुढील प्रवाहाला एकत्रितपणे नाईल नदी असे संबोधले जाते. उत्तरेकडे वाटचाल करून नाईल नदी भूमध्य समुद्रामध्ये मिळते.

ही नदी अल कणातिर अल खैऱ्या या शहराशेजारी दोन शाखांमध्ये विभक्त होऊन एक नाईक तर दुसरी डैमिएटा आता अशा दोन शाखा वाहतात नाईल ही राशीत शहराशेजारी समुद्रास मिळते. आणि दुसरी डैमिएटा त्यांनी आता या शहराशेजारी समुद्रात मिळते. या नदीवरील सर्वात मोठे धरण आस्वन हे आहे. या धरणावर सुमारे 2100 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते. तसेच हे जगातील सर्वात जास्त पाणीसाठा असलेले तिसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. हा पाणीसाठा तब्बल 4660.92 टीएमसी इतका आहे.

हे धरण 1960 ते 1970 दरम्यान बांधण्यात आले. या नाईल नदीच्या पानलोट क्षेत्र 34 लाख वर्ग किलोमीटर एवढे असून ती इथोपिया, इजिप्त, सुदान, युगांडा, कोगोच्च्य लोकशाही प्रजसत्ताक आणि तांझानिया या सहा देशांन मधून वाहते. उत्तर आफ्रिकेतील सुदान आणि इजिप्त या देशांमध्ये नाईल जवळजवळ पूर्णपणे वाळवंटा मधून वाहते. ऐतिहासिक काळापासून इजिप्त मधिल जीवन संपूर्णपणे नाईल नदीवर अवलंबून आहे. आणि नाईल च्या काठावर वसलेले आहेत याशिवाय इजिप्टच्या संस्कृतीमध्ये नाईला अनन्य साधारण महत्त्व आहे.

ॲमेझॉन नदी

जगातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे ॲमेझॉन नदी. ही जगातील सर्वात मोठी आणि दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातल्या पर्वत राशीत नेवाळू मिस मी या एका डोंगर माथ्यावर होतो. तर या नदीचे मुख ब्राझील देशात अटलांटिक महासागरामध्ये आहे.

ॲमेझॉन नदीची एकूण लांबी सुमारे सहा हजार चारशे किलोमीटर इतकी आहे. व 70.5 लाख वर्ग किलोमीटर तितके क्षेत्रफळ व्यापलेले ॲमेझॉन चे खोरे हे जगातील सर्वात मोठे खोरे आहे. या नदीचे उगम स्थानाची समुद्र सपाटीपासून 4267 मीटर म्हणजेच 13999 फूट इतकी आहे. या नदीचा सरासरी प्रवाह दोन लाख नऊ हजार घनमीटर पर सेकंद म्हणजेच 74 लाख घनफूट पर सेकंद इतका आहे. ॲमेझॉनच्या उपनद्यांवर सुमारे 412 धरणे बांधलेली आहेत.

ॲमेझॉन नदीची उपनदी जिकू या नदीवर जगातील सर्वात मोठे चौथ्या क्रमांकाची वीज निर्मिती करणारे बेलो मोंटे हे धरण 2016 ते 2019 साली बांधण्यात आले आहे. या धरणावर तब्बल 11233 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाणार आहे. ॲमेझॉन हि अमेरिका खंडाच्या दक्षिण तुकड्यातील महाकाय नदी आहे. पृथ्वीवरील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी आणि अलीकडच्या मोजणी प्रमाणे सर्वाधिक सुमारे सात हजार किलोमीटर इतकी लांब नदी आहे. तिच्या पात्राची सर्वाधिक रुंदी 120 किलोमीटर इतकी आहे.

यामुळे पलीकडचा तीर दिसत नसणाऱ्या ॲमेझॉन नदीला समुद्र नदी असे देखील म्हणतात. ब्राझील देशातून वाहणाऱ्या या नदीचे बांध क्षेत्र आणि उपनद्यांची खोरी हे पृथ्वीवरील अद्भुत क्षेत्र आहे. याची व्याप्ती भारताच्या क्षेत्रफळाच्या जवळजवळ पाचपट इतकी आहे. पाण्यात सूर मारून पुढे घेऊन मासा पकडून वर झेप घेणारे सारखे पक्षी आपणास माहित आहेत पण ॲमेझॉनच्या काही क्षेत्रातील नेहमी बुडालेल्या जंगलात पाण्यातून वर हवेत आठ ते दहा फूट झेप घेऊन झाडांवरील पक्षी पकडून पुन्हा पाण्यात सूर मारणाऱ्या मच्छी जाती आहेत.

त्यांना मासा चाळीस फुटांपेक्षा जास्त लांब ॲनाकोंडा साप यांसह कोट्यावधी वैशिष्ट्यपूर्ण जीव जातींची धारणा करणाऱ्या या ॲमेझॉन जंगलात पृथ्वीवरील सर्वाधिक जैविक विविधता आणि प्रतिघन मीटर वार्षिक जैव वस्तुमान उत्पादकता आहे. दक्षिण अमेरिका खंडातील या नदीचा वेगवान आणि बलवान प्रवाह अनेक उपनद्यांचे पाणी घेत वळणे घेत पूर्वेकडे वाहतो आणि नदीमुखातून जवळजवळ 200 किलोमीटर पर्यंत अटलांटिक महासागरात आत शिरतो व तिथपर्यंत सागरात नदी म्हणून अस्तित्वात दाखवतो

यागत्से नदी

जगातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकाची नदी आहे यागत्से नदी. ही आशियातील सर्वात लांब आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे या नदीचा उगम गेला देतौग शिखर येथे होते संपूर्णपणे चीन मधून वाहणाऱ्या या नदीची लांबी 6300 किलोमीटर आहे. ही पूर्व चीन शांघाई नदी या ठिकाणी समुद्रास मिळते.

या नदीची समुद्र सपाटीपासूनची उंची 5.42 मिटर आहे. या नदीचा सरासरी प्रवाह 20266 घनमीटर पर सेकंद म्हणजेच दहा लाख 65 हजार 300 घनफूट पर सेकंद इतका आहे. जगातील सर्वात मोठे जलविद्युत निर्मिती करणारे थ्री गोर्जस धरण या नदीवर बांधण्यात आलेले आहे. हे धरण 22500 मेगावॉट इतकी वीज निर्मिती करते. या नदीच्या साधारण आठ मुख्य उपनद्या आहेत या मुख्य नदीवर तीन धरणे आहेत.

मिसीसिपी नदी

जगातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकाची नदी आहे मिसीसिपी नदी.या नदीचा उगम मिनेसोटा राज्यातील एटस्का सरोवर मध्ये होतो. ही उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठी नदी आहे. या नदीच्या उगम स्थानाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 450 मीटर म्हणजेच 1480 फूट इतकी आहे. या नदीचा सरासरी प्रवाह 16800 घनमीटर पर सेकंद म्हणजेच पाच लाख 93 हजार घनफूट पर सेकंद इतका आहे. हि नदी मिनेसोटा आणि लुधियाना या राज्यांमधून वाहते तर विस्कॉन्स इलेनो ऑल केंटकी टेनिसे या राज्यांच्या पश्चिम सीमा व आयोगा आणि अर्कांचा या राज्यांच्या पूर्व सीमा नदीने आकल्या गेले आहेत.

या नदी वर वसलेले शहरे पुढील प्रमाणे आहेत. मिनियापोलिस, सेंट-पॉल, आयोव, सेंट-लुईस, टेनिस, बॅटन-रुज. या नदीवर छोटी मोठी धरणे मिळून 34 धरणे आहेत. यामधील काही धरणांना लॉक असे म्हणतात. या नदी वर फोंटाना हे सर्वात उंच धरण बांधले आहे. या धरणाची उंची 150 मीटर म्हणजेच 480 ft इतकी आहे. या धरणाचा पाणीसाठा 62.63 टीएमसी इतका आहे. हे अमेरिकेतील सर्वात मोठे तिसऱ्या क्रमांकाचे धरण आहे.

येनिसे

जगातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकाची नदी आहे येनिसे नदी. या नदीचा उगम मंगोलिया देशात होतो. हि नदी मंगोलिया आणि रशिया या दोन देशातून वाहते. येनिसे नदी ही नदी 5539 किलोमीटर म्हणजेच 3442 मैल इतकी वाहते. हि नदी आर्टिक महासागरातील कारा समुद्रास मिळते. या नदीच्या उगम स्थानाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 3351 मीटर म्हणजेच 1094 फूट इतकी आहे.

या नदीचा सरासरी प्रवाह १९६०० घनमीटर पर सेकंद म्हणजेच सहा लाख 90 हजार घनफूट पर सेकंद इतका आहे. या नदीची अंगारा ही उपनदी आहे. क्रास्नोयारक्स ,सायनो शूशेस्क्या हि सर्वात मोठी वीज निर्मिती करणारी धरणे याच नदीवर आहेत. सायनो शूशेस्क्या हे धरण तब्बल सहा हजार मेगावात इतकी वीज निर्मिती करते. वीज निर्मिती करणारे रशियातील सर्वात मोठे धरण आहे. या नदीवर एकूण 64 धरणे आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

जगातील सर्वात लहान नदी कोणती?

रो रिव्हर ही जगातील सर्वात लहान नदी आहे.

जगातील सर्वात मोठी नदी

जगातील सर्वात मोठी नदी अमेझॉन ही आहे.

जगातील सर्वात रुंद नदी कोणती

जगातील सर्वात रुंद नदी अमेझॉन आहे.

जगातील सर्वात लांब नदी कोणती?

जगातील सर्वात लांब नदी नाईल ही आहे

नाईल नदी कोणत्या देशात आहे?

नाईल नदी दक्षिण आफ्रिका देशात आहे.

नाईल नदी कोणत्या खंडात आहे?

नाईल नदी आफ्रिका खंडात आहे.

नाईल नदीचा उगम कोणत्या सरोवरात होतो

पांढरी नाईल व निळी नाईल ह्या दोन नाईलच्या प्रमुख उपनद्या आहेत. पांढऱ्या नाईलचा उगम व्हिक्टोरिया सरोवरामध्ये होतो तर निळ्या नाईलचा उगम इथियोपियामधील ताना सरोवरात होतो.

नाईल नदी किती देशातून वाहते?

नाईल नदी सात देशातून वाहते.

ॲमेझॉन नदीचा उगम कोठे होतो?

ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातल्या ॲण्डीझ पर्वतरांगेमधील नेव्हादो मिस्मी ह्या एका डोंगरमाथ्यावर होतो तर नदीचे मुख ब्राझील देशात अटलांटिक महासागरामध्ये आहे.

ॲमेझॉन नदीच्या उपनद्या कोणत्या?

जपुरी (कोलंबियामधील कावेटी), जरुए, माडेयरा, नेग्रो, पुरुस आणि झिंगु नद्या

ॲमेझॉन नदीचे खोरे कोणत्या प्रदेशात आहे?

ॲमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझीलमधील सर्वांत मोठा मैदानी प्रदेश आहे.

पुरागुआकु नदी कोणत्या महासागराला मिळते?

ब्राझीलमधील पुरागुआकु नदी साल्वाडोर शहराजवळ अटलांटिक महासागराला मिळते.

निष्कर्ष

आजच्या या पोस्टमध्ये आपण जगातील सर्वात लांब नद्या माहिती मराठी (Longest rivers in the world in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. जगातील सर्वात लांब नद्या (Longest rivers in the world in Marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment