Marathi Question Answers : मित्रानो प्रश्न उत्तरांचे महत्व मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आणि आजच्या या पोस्ट मध्ये आपण सर्वात जास्त वेळा विचारलेले मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेणार आहोत. आशा करतो हि प्रश्न उत्तरे तुम्हाला नक्कीच आवडतील.

Contents
- 1 मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)
- 1.1 शिवाजी महाराज जन्म कुठे झाला ?
- 1.2 जयंत नारळीकर यांचा जन्म कुठे झाला ?
- 1.3 बाजीराव चा मृत्यू कुठे झाला ?
- 1.4 डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म कुठे झाला ?
- 1.5 भीमा नदीचा उगम कुठे झाला ?
- 1.6 स्वामी विवेकानंद यांचा जन्म कुठे झाला ?
- 1.7 तापी नदीचा उगम कुठे झाला ?
- 1.8 रुसो चा जन्म कुठे झाला ?
- 1.9 संत चोखामेळा यांचा जन्म कुठे झाला ?
- 1.10 सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कुठे झाला ?
- 1.11 समाजशास्त्राचा उदय कुठे झाला ?
- 1.12 बिरसा मुंडा यांचा जन्म कुठे झाला ?
- 1.13 राजमाता जिजाबाई यांचा जन्म कुठे झाला ?
- 1.14 बाजीराव यांचा मृत्यू कुठे झाला ?
- 1.15 संभाजी महाराजांचा जन्म कुठे झाला ?
- 1.16 ई बँकिंग म्हणजे काय ?
- 1.17 सिंधुताई सपकाळ यांचा जन्म कुठे झाला ?
- 1.18 गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला ?
- 1.19 लव आणि कुश यांचा जन्म कुठे झाला ?
- 1.20 कवी यशवंत मनोहर यांचा जन्म कुठे झाला ?
- 1.21 सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला ?
- 1.22 ताराबाई शिंदे यांचा जन्म कुठे झाला ?
- 1.23 गाडगेबाबांचा जन्म कुठे झाला ?
- 1.24 बाजीरावांचा मृत्यू कुठे झाला ?
- 1.25 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला ?
- 2 सारांश
मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)
- कोसला कादंबरी माहिती मराठी (Kosla Novel Information Marathi)
- जगातील सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणारी धरणे (World’s largest hydroelectric generating dams)
शिवाजी महाराज जन्म कुठे झाला ?
शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ला येथे झाला.
जयंत नारळीकर यांचा जन्म कुठे झाला ?
जयंत नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला.
बाजीराव चा मृत्यू कुठे झाला ?
बाजीराव हे मराठा साम्राज्यातील एक प्रसिद्ध सेनानी होते. तो मराठयांचा पाचवा पेशवा म्हणून काम करण्यासाठी ओळखला जातो. खर्गोन जिल्ह्यात बजीराव यांचे निधन झाले.
डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म कुठे झाला ?
डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म रामेश्वरम, तामिळनाडू येथे झाला.
भीमा नदीचा उगम कुठे झाला ?
भीमा नदी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ८६० कि. मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म कुठे झाला ?
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे झाला.
तापी नदीचा उगम कुठे झाला ?
मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेमध्ये मुलताई जवळ उगम पावते.
रुसो चा जन्म कुठे झाला ?
रुसो चा जन्म स्वत्झर्लंडची राजधानी जिनीव्हा येथे ईझाक रूसो व आई सूझान बर्नार्ड यांच्या पोटी झाला.
संत चोखामेळा यांचा जन्म कुठे झाला ?
देऊळगाव मध्ये 14 व्या शतकामध्ये संत चोखामेळा यांचा जन्म झाला.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कुठे झाला ?
वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमधील नाडियाड गावात झवेरभाई आणि लाडबाई यांच्या घरी झाला.
समाजशास्त्राचा उदय कुठे झाला ?
भारतामध्ये समाजशास्त्रीय विचार अगदी कौटिलीय अर्थशास्त्रा पासून श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोश गंथांपर्यंत आढळत असले, तरीही समाजशास्त्र हा विषय मुंबई विदयापीठात १९१९ मध्ये स्थापन झाला. मुंबई व कलकत्ता ही सुरूवातीच्या काळात त्यांची प्रमुख केंद्रे राहिली.
बिरसा मुंडा यांचा जन्म कुठे झाला ?
बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर, १८७५ रोजी झाला.
राजमाता जिजाबाई यांचा जन्म कुठे झाला ?
जिजामाता, (राजमाता जिजाऊ) यांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.
बाजीराव यांचा मृत्यू कुठे झाला ?
रणरणत्या उन्हात घोडेस्वारी करताना रावेरखेडी या छोट्याशा गावाजवळ त्यांना अचानक उष्माघात झाला.
यातच 28 एप्रिलला त्यांनी नर्मदेच्या तिरावर वयाच्या 40 व्या वर्षी प्राण सोडले.
संभाजी महाराजांचा जन्म कुठे झाला ?
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७ साली झाला.
ई बँकिंग म्हणजे काय ?
ई बँकिंग मध्ये तुमची बँक तुम्हाला असे अधिकार देते ज्यात तुम्ही घरी बसल्या बँकेचे व्यवहार करू शकतात जसे बँक खतेची तपशील करणे, किती रक्कम आहे ते जाणून घेणे, मागील काही व्यवहार बघू शकतात, ऑनलाईन पैशांचे देवाण घेवाण करू शकता आणि इतर अनेक कामे जलद गतीने आणि कमी वेळेत करू शकतात.
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म कुठे झाला ?
समाजसुधारक सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात गुरेढोरे पाळणाऱ्या गरीब कुटुंबात झाला.
गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला ?
५६३ मध्ये लुंबिनी येथे बुद्धाचा जन्म झाला.
लव आणि कुश यांचा जन्म कुठे झाला ?
वनवासात जाताना ती गरोदर असते. आणि वनवासात ऋषींच्या आश्रमात बाळंतपण होऊन तिला लव-कुश ही जुळी मुलं होतात. ती त्यांना गीतांतून रामकथा शिकवते. आणि जरा मोठे झाल्यावर म्हणजे साधारण ८-९ वर्षांचे झाल्यावर ही दोन्ही मुलं अयोध्येत येऊन रामालाच त्याची कथा ऐकवतात.
कवी यशवंत मनोहर यांचा जन्म कुठे झाला ?
यशवंत मनोहर यांचा जन्म येरला, ता. काटोल, जि. नागपूर येथे झाला.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला ?
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला.
ताराबाई शिंदे यांचा जन्म कुठे झाला ?
ताराबाई शिंदे यांचा जन्म आजच्या महाराष्ट्रातील बेरार प्रांतातील बुलढाणा येथील बापूजी हरी शिंदे यांच्या घरी १८५० मध्ये मराठा कुटुंबात झाला.
गाडगेबाबांचा जन्म कुठे झाला ?
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला.
बाजीरावांचा मृत्यू कुठे झाला ?
रणरणत्या उन्हात घोडेस्वारी करताना रावेरखेडी या छोट्याशा गावाजवळ त्यांना अचानक उष्माघात झाला.
यातच 28 एप्रिलला त्यांनी नर्मदेच्या तिरावर वयाच्या 40 व्या वर्षी प्राण सोडले
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला ?
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील “महू” गावात झाला. महू गाव इंदोर जवळ आहे.
सारांश
आजच्या या लेखामध्ये आपण मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.