prayog information in marathi: प्रयोग म्हणजे कर्त्याची, क्रियापदाची जी जुळणी ठेवणे किंवा रचना केलेली असते त्यालाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. आजच्या या पोस्ट मध्ये आपण प्रयोग माहिती मराठी (prayog information in marathi)
प्रयोगाचे एकूण चार प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे
- कर्तरी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- भावे प्रयोग
- मिश्र प्रयोग
Contents
- 1 प्रयोग माहिती मराठी (prayog information in marathi)
- 1.0.1 कर्तरी प्रयोग
- 1.0.2 सकर्मक कर्तरी प्रयोग
- 1.0.3 अकर्मक कर्तरी प्रयोग
- 1.0.4 कर्मणी प्रयोग
- 1.0.5 प्रधान कर्तू कर्मणी
- 1.0.6 शक्य कर्मणी
- 1.0.7 प्राचीन किंवा पुरण कर्मणी
- 1.0.8 समापन कर्मणी
- 1.0.9 कर्म कर्तरी
- 1.0.10 भावे प्रयोग
- 1.0.11 अकर्मक भावे
- 1.0.12 मिश्र किंवा संकर प्रयोग
- 1.0.13 कर्तु कर्म संकर
- 1.0.14 कर्तु भाव संकर
- 1.0.15 कर्मभाव संकर
- 2 निष्कर्ष (summary)
प्रयोग माहिती मराठी (prayog information in marathi)
कर्तरी प्रयोग
कर्तरी प्रयोग म्हणजे जेव्हा कर्त्याची लिंग, वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्या वाक्यरचनेस कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदाहरणार्थ तो आंबा खातो.
कर्ता तो, कर्म आंबा, क्रियापद खातो.
कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथम विभक्तीचा आहे. कर्म असल्यास प्रथमेची किंवा द्वितीय असते व क्रियापदे कर्त्याप्रमाणे बदलते.
कर्तरी प्रयोगातील उपप्रकार पुढील प्रमाणे
- सकर्मक कर्तरी प्रयोग
- अकर्मक कर्तरी प्रयोग
सकर्मक कर्तरी प्रयोग
सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे ज्या कर्तरी प्रयोगात कर्म असते त्या सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदाहरणार्थ
मोहन पाणी आणतो, राखी पुस्तक वाचते.
यामधील पाणी व पुस्तक हे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे.
- शब्दसिद्धी माहिती मराठी (shabdhsidhi information in marathi)
- लिंगभेद माहिती मराठी (lingbhed information in marathi)
अकर्मक कर्तरी प्रयोग
अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे कर्म नसणाऱ्या कर्तरी प्रयोगास अकर्मक कर्तरीक प्रयोग असे म्हणतात.
उदाहरणार्थ
- विद्यार्थी अस्वस्थ होते.
- कावळा उडाला
कर्मणी प्रयोग
कर्मणी प्रयोग म्हणजे ज्या वाक्यात क्रियापद हे कर्मचाल लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा ते वाक्यरचनेस कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदाहरणार्थ
- सुभाष ने पेरू खाल्ला.
- कुसुमने पेरू खाल्ला. इत्यादी
कर्मणी प्रयोगात कर्ता नेहमी तृतीयेचा अथवा चतुर्थीचा असतो. व कर्म हे प्रथमच असते या प्रयोगात सकर्मक किंवा अकर्मक हे दोन प्रयोग असणारच नाही कारण कर्म असल्याशिवाय हा प्रयोग होणारच नाही.
कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार पुढील प्रमाणे
- प्रधान कर्तू कर्मणी
- शक्य कर्मणी
- प्राचीन किंवा पुराण कर्मणी
- समापन कर्मणी
- कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी
प्रधान कर्तू कर्मणी
प्रधान कर्तू कर्मणी म्हणजे ज्या प्रयोगात क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत असले तरी बहुतेक करतात प्रधान असतो. त्यास प्रधान करतो कर्मणी असे म्हणतात.
उदाहरणार्थ
- तिने गाणे म्हटले.
- मला हा डोंगर चढवतो इत्यादी.
शक्य कर्मणी
शक्य कर्मणी म्हणजे ज्या वाक्यात क्रियापदने शक्यतो सुचवलेली असते त्यास शक्य कर्मणी असे म्हणतात.
उदाहरणार्थ
- रामाच्याने काम करते.
प्राचीन किंवा पुरण कर्मणी
प्राचीन मराठी सकर्मक धातूला जी हा प्रत्यय लावून करी जे, बोली जे, के जे, वनी जे अशी रुपे असतात त्यास प्राचीन किंवा पुरण कर्मणी असे म्हणतात.
उदाहरणार्थ
जो-जी, जो-जो, की-जे, परमार्थ, लाहो, इंदिरासी, बोलीचे इत्यादी.
समापन कर्मणी
समापन कर्मणी म्हणजे ज्या संयुक्त क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो अशा प्रयोगाला समापन कर्मणी असे म्हणतात.
उदाहरणार्थ
त्याची गोष्ट लिहून झाली.(यामध्ये समाप्तीचा अर्थ सुचवला आहे.)
कर्म कर्तरी
कर्म कर्तरी म्हणजे ज्या वाक्यातील कर्माला प्राधान्य देऊन विधान करावयाचे असते किंवा करता स्पष्ट नसतो किंवा कर्त्याचा उल्लेख टाळावयाचा असतो व इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावून त्याची रचना केली जाते त्यास कर्मकर्तरी असे म्हणतात.
उदाहरणार्थ
- रावण रामाकडून मारला जातो.
- न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.
भावे प्रयोग
भावे प्रयोग म्हणजे वाक्यातील कर्त्याची अथवा कर्माची लिंग वचन व पुरुष यांच्यात बदल केला तरी क्रियापदाच्या रूपात काहीच बदल होत नाही त्यास प्रयोग असे म्हणतात.
उदाहरणार्थ
मुलाने बैलास मारले, बायकांनी बैलास मारले
भावे प्रयोगात कर्ता तृतीयेचा अथवा चतुर्थीचा असतो कर्म द्वितीयेचा असतो क्रियापद तृतीय पुरुषी एकवचन नपुसकलिंगी असते.
भावे प्रयोगाचे तीन उपप्रकार पडतात ते पुढील प्रमाणे
- सकर्मक भावे
- अकर्मक भावे
- भावे कर्तरी प्रयोग
सकर्मक भावे
सकर्मक भावे म्हणजे ज्या भावे प्रयोगात क्रियापद सकर्मक असते म्हणजेच क्रियापदा बरोबर कर्म असते त्यास सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.
- उदाहरणार्थ
- गवळीने गाईस बांधले. रामाने रावणास मारले.
अकर्मक भावे
अकर्मक भावे म्हणजे ज्या भावे प्रयोगात क्रियापद अकर्मक असते म्हणजेच क्रियापदा बरोबर कर्म नसते त्यास अकर्मक भावे असे म्हणतात.
उदाहरणार्थ
- पेरू खाल्ला की मळमळते.
- सहलीला जाताना राजगडाच्या पायथ्याशी उजडले.
मिश्र किंवा संकर प्रयोग
मिश्र प्रयोग म्हणजे ज्या वाक्यात दोन प्रयोगाचे मिश्रण संकर झालेले आढळते त्यास मिश्र प्रयोग किंवा संकर प्रयोग असे म्हणतात.
मिश्र प्रयोगातील उपप्रकार पुढील प्रमाणे
- कर्तु कर्म संकर
- कर्तु भाव संकर
- कर्म भाव संकर
कर्तु कर्म संकर
कर्तु कर्म संकर म्हणजे ज्या वाक्यात कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगाचे अस्तित्वा आढळून येते त्यास कर्तु कर्म संकर असे म्हणतात.
उदाहरणार्थ
- तू मला पुस्तक दिलेस.
तू मला पुस्तक दिलेस या उदाहरणांमध्ये कर्त्याची वचन तू ऐवजी तुम्ही मला पुस्तक दिले असे वाक्य होईल व त्या वाक्यातील कर्माचे वचन पुस्तक ऐवजी पुस्तके केले तर तुम्ही मला पुस्तके दिली हे वाक्य होईल म्हणून हा कर्तु कर्म संकर प्रयोग आहे.
कर्तु भाव संकर
कर्तु भाव संकर म्हणजे ज्या वाक्यात कर्तरी व भावे या दोन्ही प्रयोगाचे अस्तित्व आढळून येते त्यास कर्तु भाव संकर असे म्हणतात.
उदाहरणार्थ
- तू घरी जायचे होतेस.
तू घरी जायचे होतेस या उदाहरणांमध्ये कर्त्याची लिंग वचन व पुरुष बदलून त्याने घरी जायचे होते तिने घरी जायचे होते व त्यांनी घरी जायचे होते ही वाक्य तयार होती म्हणजे भावे प्रयोग परंतु कर्त्याच्या वचनाप्रमाणे तुम्ही घरी जायचे होते म्हणजे वाक्यातील क्रियापद हे अंशतः कर्तरी आहे म्हणून हा कर्तु भाव संकर प्रयोग आहे.
कर्मभाव संकर
कर्मभाव संकर म्हणजे ज्या वाक्यात कर्मणी व भावे या दोन्ही प्रयोगाचे अस्तित्व आढळून येते त्यास कर्मभाव संकर प्रयोग असे म्हणतात.
उदाहरणार्थ
- वडिलांनी मुलाला शाळेत घातले
वडिलांनी मुलाला शाळेत घातले या उदाहरणांमध्ये कर्ता हा तृतीयेचा आहे. म्हणून हा कर्तरी प्रयोग नव्हे जर या वाक्यात कर्माची लिंग व वचन बदलून पाहिले तर जर मुलीला शाळेत घातली मुलांना शाळेत घातले अशा प्रकारचे वाक्य तयार होईल म्हणून हा कर्मभाव संकर प्रयोग आहे.
निष्कर्ष (summary)
आजच्या या लेखात आपण प्रयोग माहिती मराठी (prayog information in marathi) जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.