lingbhed information in marathi : लिंगभेद म्हणजे नामाच्या रूपावरून नामाने दर्शीत पदार्थ विषयी पुरुषोत्त्वस्त्रीत्व व नपुसकत्व यांचा बोध होतो तेव्हा त्याला नामाचे लिंगभेद असे म्हणतात.

नामाचे मुख्य तीन लिंग आहेत.
- पुलिंगी
- स्त्रीलिंग
- नपुसकलिंगी
Contents
लिंगभेद माहिती मराठी (lingbhed information in marathi)
पुलिंगी
पुल्लिंगी म्हणजे प्राणी वाचक नामातील पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणार शब्दाला पुलिंगी असे म्हणतात. तो हा शब्द पुरुषांसाठी वापरतात.
उदाहरणार्थ
तो मेंढा, तो बैल, तो वाडा, तो चुलता इत्यादी
नामातील दुसऱ्या प्रकार बघुयात तो म्हणजे
स्त्रीलिंग
स्त्रीलिंगी म्हणजे स्त्री किंवा मदी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंग असे म्हणतात. ती हा शब्द स्त्रीसाठी वापरतात.
उदाहरणार्थ ती मेंढी, ती मुलगी, ती पाटी, ती ईमारत इत्यादी.
नामातील तिसरा प्रकार बघुया तो म्हणजे
नपुसकलिंगी
नपुसकलिंगी म्हणजे ज्या नामाच्या रूपावरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्याला नपुसकलिंगी असे म्हणतात. ते या शब्दाने या जातीचा उल्लेख होतो.
उदाहरणार्थ
ते पुस्तक, ते कुत्रे, ते घर, ते मेंढरू इत्यादी.
- मुंबई शहरातील धरणे माहिती मराठी (Information about dams in Mumbai)
- उभयान्वयी अव्यय माहिती मराठी (ubhayahvyi avyay in marathi)
वचन म्हणजे काय ?
वचन
नामाने दर्शवलेली वस्तू एक आहे की त्या वस्तू एकाहून अधिक आहे असे कळते. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवणे हा एक धर्म आहे. त्यास वचन असे म्हणतात. वचनाचे दोन प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे
- एकवचन
- अनेकवचन
एकवचन
एक वचन म्हणजे ज्या नामाच्या रूपावरून एकाच वस्तूचा बोध होतो त्यास एकवचन असे म्हणतात.
उदाहरणार्थ
मुलगा, गाय, पाटी, इमारत, पुस्तक, इत्यादी
वचनातील दुसऱ्या म्हणजे
अनेकवचन
अनेकवचन म्हणजे नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो तेव्हा त्यास अनेक वचन असे म्हणतात.
उदाहरणार्थ
मुली, गाई, पाट्या, इमारती, पुस्तके इत्यादी
नामाचे मूळ रूप हेच त्याचे एक वचन असते. नामाची अनेक रूपाची नामे बनविताना काही नामांना प्रत्यय लागतात व काही रुपे एकवचनी राहतात यामध्ये याचे काही उदाहरणे
आकारांत पुलिंगी नामाचे एकवचन एकारान्त होते.
उदाहरणार्थ
वडा वडे, कुत्रा कुत्रे, मासा मासे इत्यादी
आकारांत खेरीज इतर पुल्लिंग नामाची रुपे दोन्ही वचनात सारखेच राहतात
उदाहरणार्थ
बैल बैल, कवी कवी, गहू गहू
आकारांत स्त्रीलिंगी नामाची अनेक वचन आकारांत किंवा इकारांत होते.
उदाहरणार्थ
वीट विटा, भिंत भिंती, सून सूना इत्यादी.
आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन याकारांत होते
उदाहरणार्थ
बी बिया, बई बाया, भाकरी भाकऱ्या इत्यादी.
उकारांत स्त्रीलिंगी नामाची अनेक वचन वाकांरांत होते.
उदाहरणार्थ
सासू सास्वास, जळू जळवा, जाऊ जावा,
आकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारात होते.
उदाहरणार्थ
घर घरे, शेत शेती, फुल फुले इत्यादी.
उकारांत नपुसकलिंगी नामाची अनेकवचन एकारान्त होते.
उदाहरणार्थ
वासरू वासरे, लिंबू लिंबे, पाखरू पाखरे इत्यादी.
इकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होते.
उदाहरणार्थ
खेडे खेडी, गाणे गाणी इत्यादी.
निष्कर्ष (summary)
आजच्या या पोस्ट मध्ये आपण लिंगभेद माहिती मराठी (lingbhed information in marathi) ही माहिती बघितली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.