शब्दसिद्धी माहिती मराठी | shabdhsidhi information in marathi

shabdhsidhi information in marathi शब्दसिद्धी म्हणजे शब्द कसा बनतो म्हणजेच कसा सिद्ध होतो त्यास शब्दसिद्धी असे म्हणतात.आजच्या या लेखात आपण शब्दसिद्धी (shabdhsidhi information in marathi) जाणून घेणार आहोत.

shabdhsidhi indormation in marathi
शब्दसिद्धी माहिती मराठी (shabdhsidhi information in marathi)

शब्दसिद्धी माहिती मराठी (shabdhsidhi information in marathi)

शब्दसिद्धीचे एकूण सात प्रकार पडतात ते पुढीप्रमाणे.

 • तत्सम
 • तत्भव
 • देशी
 • परभाषीय
 • सामासिक शब्द
 • अभ्यस्त शब्द
 • साधीत शब्द

तत्सम शब्द

तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतील जे शब्द जसेच्या तसे म्हणजे ज्यांच्या स्वरूपात काहीही बदल न होता मराठी भाषेत आले त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात

उदाहरणार्थ पुष्प, वन, जल, प्रिती, भीती, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, भगवान, परंतु, धर्म, कवी, मधू, गुरू इत्यादी.

तत्भव शब्द

तत्भव शब्द म्हणजे काही संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होऊन येतात त्यास तत्भव शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ घर (गृह), हाथ (हस्त), गाव (ग्राम), चाक (चक्र), पान (पर्न), सासरा (स्वसू), घस (ग्रास) इत्यादी.

देशी शब्द

देशी शब्द म्हणजे मराठीत काही शब्द असे आढळतात की ते तत्सम, तत्भव किंवा परभाशिय नाहीत त्यांना देशी शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ गुडघा, ढेकूण, वांगी, झाड, दगड, वांगी, झाड, दगड, डोके, पीठ, बाजरी, चिमणी इत्यादी.

परभाषीय शब्द

परभाषीय शब्द म्हणजे संस्कृत सोडून इतर परकीय भाशेतून मराठीत आलेले किंवा रूढ झालेल्या शब्दांना परभाष्य शब्द असे म्हणतात.

परभाषीय शब्दाचे एकूण आठ उपप्रकार पडतात ते पुढील प्रमाणे

 • फारसी शब्द
 • अरबी शब्द
 • पोर्तुगीज शब्द
 • कानडी शब्द
 • गुजराती शब्द
 • इंग्रजी शब्द

सामासिक शब्द

सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन बनलेल्या नवीन शब्दास सामासिक शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ पोळपाट, ताटवटी, निळकंठ, शामवर्ण, दारोदार इत्यादी.

अभ्यस्त शब्द

अभ्यस्त शब्द म्हणजे अभ्यस्त म्हणजे त्या शब्दाची दुप्पट किंवा पुनरावृत्ति करणे त्याला अभ्यस्त शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ लाललाल, समोरासमोर, हळूहळू, शेजारीपाजारी, हालचाल, ओळखपाळख, दगडबिगड, आंबटचिंबट इत्यादी.

अभ्यस्त शब्दाचे एकूण तीन प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे

 • पूर्णाभ्यस्थ शब्द
 • अंशभ्यस्थ शब्द
 • अनुकरणवाचक शब्द

साधीत शब्द

साधीत शब्द म्हणजे सिद्ध शब्दापासून जा, ये,बस, कर, करू, करता, करणारा, होकार, प्रतिकार यासारखे शब्द बनवितात त्यांना साधीत शब्द असे म्हणतात.

साधीत शब्दाचे एकूण दोन प्रकार पडतात

 • उपसर्ग साधित (उपसर्ग घटित) शब्द
 • प्रत्यय साधित (प्रत्यक घटीत) शब्द

उपसर्ग साधित (उपसर्ग घटित) शब्द

या प्रकारामध्ये मूळ धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही साधित शब्द बनवितात त्या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. ही अक्षरे अवयवरूप असून धातूचा मूळ अर्थ फिरवतात. उपसर्ग हे स्वतंत्रपणे येत नाही शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लावून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ आहार, विहार, सुगम, सुगंध, प्रबल, प्रकोप, पराजय, नाराज, निरोगी, बेजबाबदार, हररोज, सरदार, प्रगती, प्रहार इत्यादी.

प्रत्यय साधित (प्रत्यक घटीत) शब्द

प्रत्यय साधित (प्रत्यक घटीत) शब्द म्हणजे शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून साधीच शब्द तयार होतात. अशा अक्षरांना प्रत्यय साधित शब्द असे म्हणतात. जन या धातूला प्रत्यय लागून जनता जननी हे शब्द तयार होतात. या शब्दाला प्रत्यय साधित शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ पाटीलकी, पेरणी, गाडीवान, गुलामगिरी, दादागिरी इत्यादी.

शब्दसिद्धी म्हणजे काय ?

शब्दसिद्धी म्हणजे शब्द कसा बनतो म्हणजेच कसा सिद्ध होतो त्यास शब्दसिद्धी असे म्हणतात.

शब्दसिद्धीचे किती प्रकार पडतात ?

शब्दसिद्धीचे एकूण सात प्रकार पडतात ते पुढीप्रमाणे.
तत्सम
तत्भव
देशी
परभाषीय
सामासिक शब्द
अभ्यस्त शब्द
साधीत शब्द

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण शब्दसिद्धी माहिती मराठी (shabdhsidhi information in marathi) जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment