Vasota Fort Information In Marathi : वासोटा हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे.वासोटा किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर हा अगदी प्रसन्न आणि रमणीय आहे.महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहास प्रेमी या वासोटा किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात.वासोटा हा किल्ला महाराष्ट्राच्या सातारा या जिल्ह्यामध्ये आहे.हा किल्ला जावळी खोऱ्यातून वाहणाऱ्या कोयना नदीजवळ जंगल भागांमध्ये निसर्ग संपन्न वातावरणात वसलेला आहे.वासोटा हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील किल्ला आहे या किल्ल्याला व्याघ्रगड या नावाने देखील ओळखले जाते.वासोटा या किल्ल्याची उंची 4267 फूट इतकी आहे तर समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची 1171 मीटर इतकी आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर हा गुन्हेगारांना कैद करून ठेवण्यासाठी केला जात होता.
Contents
- 1 वासोटा किल्ला माहिती मराठी (Vasota Fort Information In Marathi)
- 1.1 वासोटा किल्ला कुठे आहे ?
- 1.2 वासोटा किल्ल्याचे दुसरे नाव काय ?
- 1.3 वासोटा किल्ला कोणी बांधला ?
- 1.4 छत्रपती शिवरायांनी वासोटा किल्ला जिंकून घेतल्यावर त्या किल्ल्याचे नाव काय ठेवले?
- 1.5 छत्रपती शिवरायांनी वासोटा किल्ला जिंकून घेतल्यावर त्या किल्ल्याचे नाव काय ठेवले ?
- 1.6 वासोटा ट्रेक अवघड आहे का ?
- 1.7 वासोटा किल्ला का बांधला गेला ?
- 1.8 महाराष्ट्रात एकूण किती किल्ले आहेत ?
- 1.9 स्वराज्यात किती किल्ले होते ?
- 2 निष्कर्ष (summary)
वासोटा किल्ला माहिती मराठी (Vasota Fort Information In Marathi)
वासोटा किल्ल्यावर जात असताना कारवीचे दाट जंगल लागते दाट जंगलामध्ये हा किल्ला असल्याने या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी आणि प्राणी देखील पाहायला मिळतील.वासोटा किल्ल्यावर आपल्याला महादेव मंदिराचे अवशेष पाहायला मिळतील त्याचबरोबर या ठिकाणी एक मोठे सदरचे क्षेत्र देखील पाहायला मिळेल वासोटा किल्ला हा आपल्याला जीर्ण अवस्थेत असल्याचा पाहायला मिळतो.या किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्याचा वरचा भाग हा सपाट आणि अंडाकृती असल्याचे पाहायला मिळते.वासोटा हा किल्ला जवळपास सहा एकर एवढ्या परिसरात विस्तारलेला आहे वासोटा किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास वासोटा किल्ल्याचे संस्थाप हे शिलाहार वंशातील दुसरे भोजराज हे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जावळी भाग जिंकला त्यावेळेस अनेक किल्ले महाराजांनी आपल्या ताब्यात घेतले होते.
6 जून 1660 मध्ये हा किल्ला महाराजांनी सैन्याच्या हातून ताब्यात घेतला हा किल्ला खास करून गुन्हेगारांना ताब्यात ठेवण्यासाठी वापरला जात होता.इसवी सन 1706 मध्ये हा किल्ला ताई तेलानेच्या हाती गेला पुढे इसवी सन 1730 मध्ये ताई तेलानीचा पराभव करून बापू गोखले यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.वासोटा किल्ल्यावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणी आहेत या किल्ल्यावर आपल्याला बापू कडा,वाडा,महादेव मंदिराचे अवशेष अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल.कुसापूर हे गाव या किल्ल्याच्या सर्वात जवळचे असणारे गाव आहे वासोटा हा किल्ला पुणे शहरापासून 110 किलोमीटर तर सातारा शहरापासून चाळीस किलोमीटर इतके अंतरावर आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर या किल्ल्याचा सौरक्षक वातावरणामुळे या किल्ल्याला व्याघ्रगड असे नाव दिले होते.
- राजगड किल्ला माहिती मराठी (rajgadh fort information in marathi)
- शिवनेरी किल्ला माहिती मराठी (shivneri fort indormation in marathi)
पन्हाळगडावर असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला सांगून वासोटा हा किल्ला 6 जून 1660 मध्ये आपल्या ताब्यात घेतला.वासोटा या नावाच्या डोंगरावर हा किल्ला वसलेला असून किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीयदुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो. वासोट्याचे पूर्वीचे नाव व्याघ्रगड असे होते. शिवरायांनी जावळी सोबत आजूबाजूचे किल्ले जिंकले परंतु वासोटा दूर असल्यामुळे तो तेव्हा घेतला नाही. पुढे महाराज पन्हाळगडावर असताना पायदळ पाठवून राजांनी इसवी सन 1660 रोजी वासोटा किल्ला स्वराज्यात सामील केला.गडाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडे गेल्यावर शिवसागर जलाशय परिसर आपल्याला मंत्रमुग्ध करतो. गडाच्या याच बाजूला पिण्यायोग्य पाण्याच्या टाक्या आहेत.वासोटा किल्ला माहिती मराठी (Vasota Fort Information In Marathi)
वासोटा किल्ला कुठे आहे ?
वासोटा हा किल्ला सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात आहे.
वासोटा किल्ल्याचे दुसरे नाव काय ?
वासोटा किल्ल्याचे दुसरे नाव व्याघ्रगड असे आहे.
वासोटा किल्ला कोणी बांधला ?
वासोटा हा किल्ला शिलाहार वंशातील दुसरे भोजराज यांनी बांधला.
छत्रपती शिवरायांनी वासोटा किल्ला जिंकून घेतल्यावर त्या किल्ल्याचे नाव काय ठेवले?
छत्रपती शिवरायांनी वासोटा किल्ला जिंकून घेतल्यावर त्या किल्ल्याचे नाव व्याघ्रगढ असे ठेवले.
छत्रपती शिवरायांनी वासोटा किल्ला जिंकून घेतल्यावर त्या किल्ल्याचे नाव काय ठेवले ?
छत्रपती शिवरायांनी वासोटा किल्ला जिंकून घेतल्यावर त्या किल्ल्याचे नाव व्याघ्रगढ ठेवले.
वासोटा ट्रेक अवघड आहे का ?
वासोटा ट्रॅक ट्रेकिंग साठी मध्यम अवघड मानला जातो.
वासोटा किल्ला का बांधला गेला ?
छत्रपती शिवाजी महाराजांनी वासोटा या किल्ल्याचा वापर कारागृह म्हणून केला.
महाराष्ट्रात एकूण किती किल्ले आहेत ?
महाराष्ट्रात जवळपास 350 किल्ले आहेत.
स्वराज्यात किती किल्ले होते ?
स्वराज्यात जवळपास 300 किल्ले होते.
निष्कर्ष (summary)
आजच्या या लेखात आपण वासोटा किल्ला माहिती मराठी (Vasota Fort Information In Marathi) ही माहिती जाणून घेतली.ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.