तोरणा किल्ला माहिती मराठी | Torna fort information in marathi

Torna fort information in marathi: तोरणा हा किल्ला प्रचंड गडाच्या डोंगराळ भागात वसलेला आहे. त्यामुळे या किल्ल्यावर विजय मिळवणं म्हणजे आजूबाजूचा अनेक मैलांचा परिसर ताब्यात घेण्यासारखे आहे. या किल्ल्यावरून संपूर्ण परिसरावर देखरेख करणे सोपे जाईल अशी या किल्ल्याची रचना केली. इतिहासात हा किल्ला कोणी व कधी  बांधला याबद्दल काहीही पुरावा उपलब्ध नाहीत. पण साधारणतः या किल्ल्याचा निर्माण इसवी सन 14 व्या शतकाच्या शेवटच्या काळात झाला असेल.

torna fort information in marathi
तोरणा किल्ला माहिती मराठी (torna fort information in marathi)

येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैव पंथाचा आश्रम असावा असा काही इतिहासकारांचा अंदाज आहे. तोरणाच्या या आभाळी उंची आणि विस्तारलेल्या प्रदेशामुळे जेम्स दगलस कौतुकाने म्हणतात जर सिंहगड सिंहाची गुहा आहे तर तोरणाला गरुडाचे घरटेच म्हणावे लागेल.१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्या काळी जवळपास संपूर्ण भारतावर मुघलांचं राज्य होतं. अनेक परकीय आक्रमणे होत होती. आणि अशातच महाराष्ट्राच्या जनतेचे खूप हाल होत होते.

तोरणा किल्ला माहिती मराठी (torna fort information in marathi)

नावतोरणा
उंची1403 मीटर, 4601फूट
प्रकारगिरिदुर्ग
ठिकाणपुणे जिल्हा
डोंगररांगासह्याद्री
स्थापना 1470 ते 1486
तोरणा किल्ला माहिती मराठी (torna fort information in marathi)

त्यामुळे आपले स्वतःचे सुशासित आणि जनतेची सेवा करणारे राज्य असावे अशी मासाहेब जिजाऊ यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी असे संस्कार शिवरायांवर केले. आपण लढून स्वतःचे स्वराज्य निर्माण करावं असं शिवरायांनी लहानपणीच मनाशी पक्क केलं. त्यासाठी त्यांनी मावळ भागातील तरुणांना एकत्रित करण्यास सुरुवात केली. शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची प्रतिज्ञा घेऊन मावळ प्रांत काबीज करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. हे सर्व करताना त्यांचे वय फक्त 16 वर्ष होते.

इसवी सन 1647 साली शिवरायांनी तोरणा जिंकला. याच विषयापासून हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली. तोरणा किल्ला होता विजापूरच्या बादशहाकडे किल्लेदार मात्र एक मराठा. त्या किल्लेदाराला बोलवून महाराजांनी काय जादू केली हे त्यांना ठाऊक. पण दुसऱ्या दिवशी सकाळी गडावरचे बादशाही शेंडे उतरले  मराठी जरी फटका फडकू लागला शिवरायांनी गढ त्यांच्या ताब्यात घेतला. त्यामुळे या किल्ल्यास तोरणा असे नाव दिले गेले असे काही इतिहासकार सांगतात. तर काही अभ्यासकांच्या म्हणण्याप्रमाणे या गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडे होती त्यामुळे याला तोरण आहे नाव पडले असावे.

गड काबीज केल्यानंतर शिवाजी महाराजांनी गडाची पाहणी करत असताना गडाचा प्रचंड विस्तार पाहून गडाचे नाव प्रचंड घडत ठेवले. शिवरायांनी गडाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. यावेळी खोदकाम करताना सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या चार घागरी सापडल्या होत्या.  गुप्तधनाचा वापर करून तोरण आणि राजगडाचे बांधकाम करण्यात आले. त्या गुप्तधनाला देवीचा आशीर्वाद म्हणून जेथे या घागरी सापडल्या होत्या तेथे शिवरायांनी देवीचे मंदिर बांधले. या किल्ल्याचा निर्माण कोणी व कधी केला याबद्दलची काहीच माहिती उपलब्ध नाही.

14 व्या शतकात यावर कोणी विषय मिळवला असेल किंवा राज्य केले असेल हे अजून गुपितच आहे. पण इसवी सन 1470 ते 1486 च्या दरम्यान बहुमनी राजवटी साठी मलिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला.काही वर्षांच्या कालावधीत विजापूरच्या आदिलशहाने विजय मिळवला नंतर तो महाराजांनी ताब्यात घेतला. गडावर काही इमारती बांधल्या किल्ल्याची दुरुस्ती केली. संभाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला मुघलांकडे गेला. तेव्हा मुघल महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता.

पण शंकरजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपला ताब्यात आणला व याचे नाव दैवीविजय असे ठेवले. परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून मोठ्या जिगरीची लढाई करून धाडसाने गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला. यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच आहे. पुरंदरच्या तहात जे किल्ले मुघलांना दिले यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बाशहाणे लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला आहे. आणि तो देखील मराठ्यांनी काही काळातच परत मिळवला होता.

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

तोरणा किल्ला कोठे आहे ?

तोरणा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात आहे.

स्वराज्याची स्थापना करताना शिवाजी महाराजांनी प्रथम कोणता किल्ला ताब्यात घेतला ?

स्वराज्याची स्थापना करताना शिवाजी महाराजांनी प्रथम तोरणा किल्ला ताब्यात घेतला.

तोरणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले ?

तोरणा या किल्ल्याला महाराजांनी प्रचंडगड असे नाव दिले.

तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात आहे ?

तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यात कागद नदीच्या खोऱ्यात आहे.

शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या ?

शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मारता किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण तोरणा किल्ला माहिती मराठी (Torna Fort Information Marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment