लोहगड किल्ला माहिती मराठी | lohagad fort information in marathi

lohagad fort information in marathi: लोहगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. अशा या लोहगड किल्ल्याची उंची ही 3420 फूट आहे. तसेच या किल्ल्याचा पण प्रकार बघितला तर हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात येत असून या किल्ल्याची चढायची श्रेणी ही अगदी सोप्या पद्धतीची आहे. लोहगड हा किल्ला मावळ या डोंगर रांगेत येत असून या किल्ल्याचे ठिकाण भारतात महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यामध्ये आहे.

lohagad fort information in marathi
लोहगड किल्ला माहिती मराठी (lohagad fort information in marathi)

लोहगड किल्ला माहिती मराठी (lohagad fort information in marathi)

किल्ल्याचे नाव लोहगड किल्ला
ठिकाणपुणे जिल्हा
जवळचे गाव लोणावळा
उंची3420 फूट
डोंगररांगामावळ
लोहगड किल्ला माहिती मराठी (lohagad fort information in marathi)

लोहगड किल्ल्याचा इतिहास

लोहगड किल्ला हा अति मजबूत बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजी आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काही निर्माण झाली त्याही पूर्वी म्हणजेच इसवीसन पूर्व 600 वर्षापूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. इसवी सन 1489 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली. आणि अनेक किल्ले जिंकून घेतले.त्यापैकीच लोहगड हा एक इसवी सन 1564 मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा पुरण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता.

इसवी सन 1630  मध्ये हा किल्ला आदिलशाहीत आला 1657 मध्ये  शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी हा परिसर जिंकून घेतला. आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इसवी सन  1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकर यांनी लोहगडावर आणून ठेवली होती.

इसवी सन 1713 मध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यास दिला. 1720 मध्ये तो अंग्रेंकडून पेशव्यांकडे आला. 1770 नाना फडणवीस यांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत निसरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. पुढे इसवी सन 1789 मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले.

किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक भाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला. 1800 मध्ये निसुरे कैलासवासी झाले.व नंतर 1802 मध्ये त्यांच्या पत्नी कील्यावर येऊन राहिल्या 1803 मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. 4 मार्च 1818 ला जनरालप्रथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठी लोहगड सोडून गेली.

लोहगड किल्ल्यावरील पर्यटन स्थळे

गणेश दरवाजा

याच्या डाव्या उजव्या बुरुचा खाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता. आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशाला लोहगड वाडीची पाटील की देण्यात आली होती. या गणेश दरवाजाच्या आतील बाजूस शिलालेख आहे.

नारायण दरवाजा

हा दरवाजा नाना फडणवीसन यांनी बांधला. येथे एक भुयार आहे. या भुयारामध्ये भात व नाचणी साठवून ठेवली जात होती.

हनुमान दरवाजा

हा येथील सर्वात प्राचीन दरवाजा आहे. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. या दरवाजांचे काम नाना फडणवीस यांनी 1 नोव्हेंबर 1790 ते 11 जून 1794 या कालावधीत केले. महादरवाजातून आज शिरतात एक दर्गा लागतो. दर्गाच्या शेजारी सदर व लोहरखान्याचे भग्रह अवशेष आढळतात. दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याची घाणी आहे. उजवीकडे ध्वज थांबा आहे.

ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठे लागते. या कोठीत राहण्याची सोय होती. कोटीत अनेक खोल्या आहेत दर्ग्याच्या पुढे ते उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे. तेथे शिवमंदिर आहे पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे अष्टकोनी आहे. गडावरून येताना भाजे गावातील भाजे लेणी आवर्जून पहावेत. लोहगडावरच्या इमारती पडलेले आहेत. शंभर लोक झोपू शकतील एवढी एक गुहा सुद्धा गडावर आहे. लोहगडाचे उत्तरेकडील टोक निमुळती होत गेले आहे.  

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

लोहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यात आहे.

लोहगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?

लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आहे.

लोहगड या किल्ल्याची उंची किती आहे ?

लोहगड या किल्ल्याची उंची 3420 फूट इतकी आहे.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण लोहगड किल्ला माहिती मराठी ( lohgad Fort Information Marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment