राजगड किल्ला माहिती मराठी | rajgadh fort information in marathi

rajgadh fort information in marathi: छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात अधिक सहवास लाभलेला आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेला  किल्ला म्हणजे राजगड होय.राजमाता जिजाऊ या किल्ल्यावर अनेक वर्ष वास्तव्यास होत्या. अतिशय सौरक्षक व कौशल्यपूर्ण बांधकामामुळे हा किल्ला ओळखला जातो. किल्ल्याचे पूर्वीचे नाव मुरंबदेव असे होते. 26 वर्ष हा किल्ला स्वराज्याची राजधानी होता. त्यानंतर हा मान किल्ले रायगडला मिळाला. आजच्या या पोस्ट मध्ये आपण राजगड किल्ला माहिती मराठी (rajgadh fort information in marathi) जाणून घेणार आहोत.

Rajgadh fort information in marathi
राजगड किल्ला माहिती मराठी (rajgadh fort information in marathi)

राजगड किल्ला माहिती मराठी (rajgadh fort information in marathi)

किल्ल्याचे नाव राजगड किल्ला
पायऱ्या 1737
जुने नावमुरुंबदेव
गडावरील मंदिरपद्मावती मंदिर
उंची1394 मीटर
राजगड किल्ला माहिती मराठी (rajgadh fort information in marathi)

तोरणगड अर्थात प्रचंड गड त्याच्या दुरुस्तीदरम्यान तिथून सोन्याच्या नाण्यांनी भरलेला चार घागरी सापडल्या होत्या. त्यास भवानी मातेचा आशीर्वाद समजून हे गुप्तधन शिवरायांनी किल्ले राजगड येथे काम पूर्ण करण्यासाठी वापरले आणि राजगड उभा राहिला हा किल्ला अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. याच राजगड किल्ल्यात शिवरायांचे पुत्र राजाराम राजे यांचा जन्म झाला. याच किल्ल्यात महाराणी सईबाईंनी शेवटचा श्वास घेतला. छत्रपती आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये झालेल्या तहानुसार शिवरायांना आग्रहाला जावे लागले.

आग्रा कपटी औरंगजेबाने महाराजांना तसेच संभाजी राजांना बंदी बनवले होते. अत्यंत चतुराईने महाराज औरंगजेबाच्या कचाट्यातून  सही सलामत निसटून आले. तेथे राजगडावरच अशा अनेक घटनांचा साक्षीदार असलेला राजा गड आजही मावळ प्रांतात डौलात उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1647 नंतर लवकरच मावळतील निरनिराळे गड आपल्या ताब्यात घेतले त्याबरोबरच मुरूम देवही आपल्या ताब्यात घेतला. त्याला राजगड हे नाव देऊन ते आपले राजधानीचे ठिकाण केले. आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी झाली.

या डोंगराळ परिसरातूनच इतिहासातील सर्वात शक्तिशाली साम्राज्यातील एक असणाऱ्या मराठा साम्राज्याची सुरुवात झाली. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरण आहे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणाचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ला पेक्षा मोठा आहे. त्याशिवाय कोणताही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती म्हणूनच आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजागडाची निवड केली.

शिवाजी महाराजांनी 1670 पर्यंत हीच राजधानी ठेवली. शिवाजी महाराज व पुढे संभाजी महाराजांनंतर हा किल्ला एक-दोन वेळा औरंगजेबाच्या ताब्यात  गेला असला तरी तो सामान्यता मराठ्यांच्याच ताब्यात राहिला. छत्रपती शाहूंच्या कार्यकर्तेत मावळतील किल्ले भोरच्या सचिवांच्या ताब्यात दिले होते. त्यावेळी तेथे हवालदार व काही अधिकारी वर्ग असे या गडाने छत्रपती राजाराम यांचा जन्म अनुभवला. तसेच सईबाईंचा मृत्यू ही सोसला.

अफजल खानाच्या वधासाठी महाराज याच गडावरून बाहेर पडले आणि आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाल्यावर त्यांनी पहिले पाऊलही राजगडावरच टाकले. राजागडाच्या पायथ्याशी साखरगाव नावाचा एक गावे आहे. त्याबद्दल असं म्हटलं जातं की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुखरूप राजगडावर आले होते तेव्हा या गावात हत्तीवरून साखर वाटण्यात आली होती त्यामुळे या गावाचं नाव साखर गाव असे पडले.राजगड हा किल्ला त्याच्या सुरक्षिततेमुळे  आणि त्याच्या मजबूत बांधकामाच्या वैभवामुळे त्याला जिंकणे कठीण असल्याचे इतिहासात चिन्हांकित करतो.

तर हाच राजगड शिवाजी महाराजांच्या कार्यकीर्तीची आणि कार्यक्षमतेचे विस्तृतता दाखवतो. राजागडावर तीन माच्या आहेत. सुवेळा माची, पद्मावती माची आणि संजीवनी माची या तीन माच्यामध्येच राजगड विस्तारला आहे.  

राजगड किल्ल्याची रचना

  • राजगड किल्ला समुद्रसपाटीपासून 1322 मीटर उंचीवर आहे.
  •  पायथा पासून किल्ल्याची उंची 600 मीटर आहे.
  •  महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत या किल्ल्याचा बालेकिल्ला सर्वात उंच आहे. 
  • तीन दिष्याना तीन  माच्या आणि मध्ये बालेकिल्ला अशी या किल्ल्याची रचना आहे. 

पद्मावती माची

पद्मावती माची ही गडावरील सर्वात मोठी माची आहे.  पद्मावती माचीचे वैशिष्ट्य म्हणजे देवी पद्मावतीचे मंदिर मंदिर अतिशय देखणा आणि प्रशस्त आहे. या मंदिराजवळच रामेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराजवळच पद्मावती तलाव आहे. या पद्मावती माचीवर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजवाड्याचे अवशेष पूर्वी येथे राजवाडा होता हे तेथील अवशेषांवरून सिद्ध होते. या राजवाडा जवळच घोड्यांच्या जागा आणि धान्य कोठारे आहेत. हेच किल्ल्याच्या गौरवाची आठवण आहेत.पुढे पाली दरवाजाकडे जाणारी पायवाटे येथूनच आहे. 

सुवेळा माची

सुवेळा माची ही राजगडावरील सर्वात महत्त्वाची माची.   या माचीचे बांधकाम खुद्द शिवराय यांनी आपल्या देखरेकीखाली करून घेतलं होतं. तिथे या माचीचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी त्यांनी श्री गणेश मंदिराची स्थापना केली होती. सुवेळा माची किल्ल्याच्या पूर्वेला आहे. शिवाजी महाराजांनी मुरंबदेव ताब्यात घेतल्यावर  या माचींच्या रक्षणासाठी किल्ल्याच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेला तटबंदी बांधली.

येथे एक बुरुज आहे. त्या  बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. बुर्जावर चढायचे आणि डोळ्यात न मावणाऱ्या सह्याद्रीचा पर्वतरांगात विसावलेल्या निसर्गाचे दृश्य  पाहायचे. दुसऱ्या टप्प्याकडे जाताना वाटते एक उंच खडक लागतो खडक रुपी सुळक्याला सुमारे दहा फूटाचे नैसर्गिक छिद्र आहे. या छिद्रात चढून तेथील सुसाट वारा अनुभवायला मिळतो.    

संजीवनी माची

संजीवनी माची किल्ल्याच्या पश्चिमेला आहे ल. गडावर जाण्यासाठी आपण पाली दरवाजा घेत असताना संजीवनी माची कडे जाणारा अरुंद मार्ग आहे. ऐतिहासिक काळापासून जुन्या घरांचे अवशेष अजूनही येथे पहावयास मिळतात. संजीवनी माची कडे आलू दरवाजा म्हणून ओळखले जाणारे खास फाटक आहे.  तो तोरण इथून राजगडाकडे प्रवेश करण्याचा एकमेव मार्ग आहे.

याच दरवाजातून तानाजी मालुसरे यांचे शव सिंहगडावरून उंबरठ्या त्यांच्या जन्मगाविले नेले होते. इथे आल्यावर वीर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आठवल्याशिवाय राहत नाही. माची वर आपल्याला मजबूत आणि कठोर बुरूज आढळतात ते अनेकदा शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आवश्यक असल्यास संरक्षणात हल्ला करण्यासाठी वापरले जायचे. संजीवनी माचीस दुहेरी तटबंदी आहे. संजीवनी माची म्हणजे राजगडावरील अत्यंत सुरक्षित ठिकान.

शत्रू इथे पोहोचायचं म्हणजे अर्ध मेलाच व्हायचा. बाले किल्ल्यावर जाताना अतिशय वीकट आणि अडचणीची वाट पार करावी लागते. बालेकिल्ल्यावर भव्य अष्टकोणी दरवाजे आहेत ते आजही सुस्थितीमध्ये हे विशेष. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज कुटुंबासह या बालेकिल्ल्यावर राहत असत. बालेकिल्ल्याच्या माथ्यावरून नजर फिरवतात डोळ्यात मावणार नाही इतका विस्तीर्ण प्रदेश पाहायला मिळतो.

येथून अनेक गडकिल्ल्यांचे दर्शन होते बालेकिल्लाला साधारण 15 मीटर उंचीची तटबंदी बनली आहे. बालेकिल्ल्यावरून पद्मावती माझी सुवेळा माझी आणि संजीवनी माझी पूर्णपणे न्याहाळता येतात. त्यामुळे शत्रू किल्ल्याजवळ येण्याच्या खूप आधी नजरेस पडतो त्यामुळे हा गड अभेद्य होता. बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी भग्न इमारती वाडे व दारूगोळ्याच्या कोठारांचे अवशेष दिसून येतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

राजगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय ?

राजगडाचे पूर्वीचे नाव मुरंबदेव हे होते.

राजगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

राजगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे.

राजगड किल्ल्याचे पुण्यापासूनचे अंतर किती आहे ?

पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि. मी. अंतरावर राजगड हा किल्ला आहे.

स्वराज्याची पहिली राजधानी असणारा किल्ला कोणता ?

राजगड हा किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी होती.

छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म कोठे झाला ?

छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म राजगड येथे झाला.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण राजगड किल्ला माहिती मराठी (rajgadh Fort Information Marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment