कोकण पर्यटन स्थळे | Tourist places of kokan in Marathi

Tourist places of kokan in Marathi : कोकण हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा प्रशासकीय विभाग आहे या विभागात महाराष्ट्रातील एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो.कोकण परिसर हा संपूर्णता निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे त्यामुळे पर्यटनासाठी उत्कृष्ट विभाग म्हणून कोकणाकडे पाहिले जाते.आंबे,सुपारी,केळीच्या बागा,फणस,काजू कोकमची झाडे आणि डोंगर उतारावर केलेली भात शेती ही कोकणमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.

Tourist places of kokan in Marathi
कोकण पर्यटन स्थळे (Tourist places of kokan in Marathi)

कोकण पर्यटन स्थळे (Tourist places of kokan in Marathi)

1. मालवण 

मालवण हे कोकण किनारपट्टीवर बसलेले महाराष्ट्रातील एक सुंदर व आकर्षक पर्यटन स्थळ आहे.मालवण हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे.मालवणला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही.मालवण हे ठिकाण खास करून सुंदर समुद्रकिनारे,ऐतिहासिक किल्ले आणि तोंडाला पाणी सोडणारे सी फूड साठी प्रसिद्ध आहे.मालवण या ठिकाणी असणारा मालवण बीच हा या शहराचे मुख्य आकर्षण आहे.मालवण या ठिकाणी आपण मालवण बीच,नियुती बीच,रॉक गार्डन,सिंधुदुर्ग किल्ला अशी अनेक प्रसिद्ध ठिकाणे पाहू शकतो.ऑक्टोंबर ते मे हा कालावधी मालवण या ठिकाणाला भेट देण्यासाठी योग्य समजला जातो.

2. अलिबाग 

अलिबाग हे कोकण परिसरातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे.अलिबाग हे कोकण किनारपट्टीवर असलेले एक लहान शहर आहे जे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात वसलेले आहे.अलिबाग या ठिकाणाला महाराष्ट्राचा गोवा म्हणून ही ओळखले जाते कारण या ठिकाणाला तीनही बाजूंनी समुद्रांनी वेडलेले आहे.अलिबाग हे ठिकाण खास करून सुंदर समुद्रकिनारे,ऐतिहासिक किल्ले आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते.अलिबाग बीच हे अलिबाग मधील प्रमुख आकर्षण आहे जे मऊ वाळू आणि सौम्य लाटा असलेला सुंदर समुद्रकिनारा आहे. ऑक्टोबर ते मे हा कालावधी अलिबाग या ठिकाणाला भेट देण्यासाठी योग्य समजला जातो.

3. गणपतीपुळे

गणपतीपुळे हे महाराष्ट्रात कोकण विभागातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे जे श्री गणेशाच्या प्रसिद्ध मंदिरासाठी ओळखले जाते.गणपतीपुळे हे ठिकाण महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले आहे गणपतीपुळे हा एक छोटासा आणि सुंदर समुद्रकिनारा आहे जो आध्यात्मिक प्रवासासाठी पर्यटकांचे आवडते ठिकाण बनलेले आहे.या ठिकाणी असणाऱ्या चारशे वर्ष जुन्या गणेश मंदिरासाठी गणपतीपुळे हे ठिकाण प्रसिद्ध आहे.समुद्रकिनाऱ्यावर मंदिराचे स्थान हे त्याचे आकर्षण आणि आध्यात्मिक शोभा वाढवते विशेषता या ठिकाणी गणेश चतुर्थी उत्सवात दरवर्षी हजारो भाविक येत असतात.

4. काशीद बीच

काशीद हे महाराष्ट्राचा कोकण किनारपट्टीवर वसलेले एक सुंदर गाव आहे.हे ठिकाण खास करून सुंदर समुद्रकिनारा आणि निसर्गरम्य परिसरासाठी ओळखले जाते जे अलिबाग पासून साधारणता 30 किलोमीटर इतके अंतरावर आहे.पांढरी शुभ्र वाळू,निळसर समुद्रकिनारा आणि हिरव्यागार पर्वतांसाठी काशीद बीच ओळखला जातो.विश्रांती आणि नैसर्गिक सौंदर्य शोधणाऱ्या अनेक पर्यटकांसाठी हा बीच खूप लोकप्रिय आहे.काशीद बीचवर आकर्षक समुद्र किनारा व्यतिरिक्त हिरव्यागार टेकड्या आणि परिसरात असणारी जंगले देखील आहेत हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला बरेच पर्यटक काशीद बीचला भेट देण्यासाठी येत असतात.

5. दिवेआगार

दिवेआगर हे महाराष्ट्र कोकण परिसरातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे.दिवेआगार हे ठिकाण रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील एक सुंदर गाव आहे.हे ठिकाण खास करून सुंदर समुद्रकिनारे,नैसर्गिक आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते,दिवेआगार हे ठिकाण त्याच्या विस्तृत आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.दिवेआगर हा समुद्रकिनारा पांढऱ्या बाळू ने आणि नारायणच्या झाडांनी सजलेला आहे.या ठिकाणी आपण कुटुंबासमवेत किंवा मित्रांबरोबर जाऊ शकतो.पावसाळा आणि हिवाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते.

6. सिंधुदुर्ग किल्ला

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर स्थित असलेला सिंधुदुर्ग हा अरबी समुद्रातील बेटावर असलेला एक प्राचीन किल्ला आहे हा किल्ला मराठ्यांच्या दूरदृष्टीचे आणि साधन संपत्तीचे एक प्रतिकरात्मक उदाहरण आहे.पराक्रमी आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असणारा हा किल्ला सभोवताली असणाऱ्या नैसर्गिक सौंदर्यामुळे ही ओळखला जातो.सिंधुदुर्ग हा किल्ला साधारणतः 48 एकर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेला आहे.इसवी सन 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार डच,पोर्तुगीज आणि ब्रिटिशांच्या आक्रमण परतवून लावण्यासाठी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधण्यात आला.या किल्ल्याच्या विशाल आकारामुळे सिंधुदुर्ग किल्ला एक प्रमुख बंदर,रक्षण किल्ला आणि ऐतिहासिक वास्तू म्हणून मान्यता प्राप्त आहे.

7. दापोली

दापोली हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थानपैकी एक आहे.दापोली ही महाराष्ट्राच्या रत्नागिरी या जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे.ब्रिटिश काळात दापोली कॅम्प म्हणूनही दापोली या ठिकाणाला ओळखले जायचे. दापोली हे ठिकाण खास करून सुंदर समुद्रकिनारे,मासोळी बाजार,ऐतिहासिक गड किल्ले व नैसर्गिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.त्याचबरोबर दापोली या ठिकाणी असणाऱ्या सुंदर वातावरणामुळे याला मिनी महाबळेश्वर म्हणूनही ओळखले जाते.दापोली या ठिकाणी आपण उन्हावरे,परशुराम भूमी,सिद्धिविनायक मंदिर,केशवराज मंदिर,हरणे बंदर,मुरुड बीच अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकतो.

8. महाड

महाड हे ठिकाण कोकण विभागातील एक सुंदर शहर म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये असलेले महाड सावित्री नदीच्या तीरावर वसलेले आहे महाड या शहराला मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक,पौराणिक आणि सामाजिक महत्त्व लाभलेले आहे.महाड या शहरा जवळचे वातावरण नेहमीच अगदी रमणी असे असते त्यामुळे हे ठिकाण महाराष्ट्रातील बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करते.अलीकडे काही वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारंवार पूर येत असल्यामुळे हा भाग त्रिकोणी द्विकल्पसारखा दीसतो.महाड या ठिकाणी आपल्याला क्रांती स्थंभ,चौकदार तळे आणि येथील लेणी अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल.

9. श्रीवर्धन

श्रीवर्धन हे कोकणातील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे जे महाराष्ट्राच्या रत्नागिरी या जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे.श्रीवर्धन या ठिकाणी असणारे प्राचीन समुद्रकिनारे हे या ठिकाणाला आणखी सुंदर बनवतात.या ठिकाणाला पेशव्यांची नगरी म्हणून ही ओळखले जाते कारण मराठा योध्यांनपैकी एक असलेले पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचा जन्म हा याच ठिकाणी झाला होता.सुंदर पांढऱ्या वाळूचे किनारे आणि स्वच्छ पाण्यामुळे हा समुद्रकिनारा या प्रदेशातील अनेक किनाऱ्यांपेक्षा कमी गजबलेला आहे त्याचबरोबर श्रीवर्धन या ठिकाणचे वातावरण स्वच्छ आणि आनंददायी असे असते जे जवळपास असणाऱ्या प्राकृतिक सौंदर्याने अनेक पर्यटकांना आकर्षित करते.

10. केळशी बीच

केळशी बीच हे ठिकाण कोकणातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे.जर तुम्हाला शांत आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ठिकाणी जायला आवडत असेल तर तुमच्यासाठी केळशी हे एक योग्य ठिकाण आहे.केळशी बीच हा समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे या ठिकाणी आपल्याला कासवाचेही दर्शन घडते ल.केळशी बीच हा परिसर सगळीकडून नारळ आणि सुपारींच्या बागांनी वेढलेला आहे त्याचबरोबर जवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये पर्यटकांना राहण्याची व जेवणाची उत्तम सुविधा आहे दापोलीपासून केळशी बीच हे ठिकाण 33 किलोमीटर अंतरावर आहे.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण कोकण पर्यटन स्थळे (Tourist places of kokan in Marathi) ही माहिती जाणून घेतली.ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

कोकण पर्यटन स्थळे (Tourist places of kokan in Marathi)

Leave a Comment