कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे | Tourist places of Kolahpur in Marathi

Tourist places of Kolahpur in Marathi : कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक शहरांपैकी एक आहे पंचगंगा नदीच्या तीरावर आणि सह्याद्री पर्वतरांगा सभोवताली वसलेले कोल्हापूर हे शहर महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते.कोल्हापूरला पूर्वी कलापुर म्हणून ओळखले जायचे तर कलापुर या नावा आधी हे नाव करवीर असे होते तसे तर हे शहर सुती कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे परंतु या ठिकाणची कोल्हापुरी चप्पल ही अख्ख्या जगात ओळखले जाते.

त्याचबरोबर भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा याच ठिकाणी भरण्यात आला होता खवयानसाठी देखील कोल्हापुरी शहर आवडीचे ठिकाण आहे.या ठिकाणी असणारी मिसळ,भेळ आणि नॉनव्हेज मध्ये खास करून तांबडा आणि पांढरा रस्सा यासाठी कोल्हापूर जिल्हा खूप प्रसिद्ध आहे.खास करून हिवाळा म्हणजेच नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी कोल्हापूर या शहराला भेट देण्यासाठी अगदी योग्य समाजाला जातो अशातच आज आपण फक्त कोल्हापूर शहरातील दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे (Tourist places of Kolahpur in Marathi)

Tourist places of Kolahpur in Marathi
कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे (Tourist places of Kolahpur in Marathi)

कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे (Tourist places of Kolahpur in Marathi)

1. महालक्ष्मी मंदिर

कोल्हापूर शहरामध्ये असणारे श्री महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे जे प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवीचे मंदिर हे महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे.आज देखील कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच या मंदिराचा उल्लेख करतात या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी विविध भाविक भक्त उत्सुकतेने येत असतात.भारतातील सर्वात शक्तिशाली आणि पवित्र पूजन स्थानांपैकी एक म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.कोल्हापूर शहरांमध्ये येऊन जर तुम्ही या मंदिराला भेट दिली नाही तर तुमची सहल पूर्ण होणार नाही.कोल्हापूर बस स्थानकापासून ही मंदिर अवघ्या 3.5 किलोमीटर अंतरावर आहे.

2. न्यू पॅलेस मुझियम

न्यू पॅलेस म्युझियम ही कोल्हापूर शहरातील एक प्राचीन इमारत आहे.या राजवाड्याच्या मध्यभागी घड्याळाचा मनोरा म्हणून ओळखला जाणारा अष्टकोणी मनोरा आहे जो खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतो.या राजवाड्याच्या तळमजल्यावर छत्रपती शाहू महाराजांची छायाचित्रे नाणी दाग दागिने वेशभूषा शस्त्रे इत्यादी वस्तू आपल्याला पाहायला मिळतात न्यू पॅलेस या राजवाड्यामध्ये आज देखील राज परिवाराचे वास्तव्य आहे.भवानी मंडप कसबा बावडा रोडवर हा पॅलेस स्थित आहे.मित्रांबरोबर आणि कुटुंबासमवेत भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.कोल्हापूर बस स्थानकापासून न्यू पॅलेस म्युझियम हे ठिकाण 3 किलोमीटर इतके अंतरावर आहे.

3. रंकाळा तलाव

रंकाळा तलाव हे कोल्हापूर शहरातील सर्वात सुंदर आणि नयनरम्य ठिकाण आहे ज्याला भेट देण्यासाठी सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस पर्यटकाची मोठी गर्दी असते.कोल्हापूर शहराची रंकाळा चौपाटी म्हणून ही याची ओळख आहे.राजघाट आणि माराघाट यांना जोडणारा हा तलाव कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी बांधला होता जो तब्बल 107 हेक्टर इतक्या मोठ्या क्षेत्रात विस्तारलेला आहे.रंकाळा तलाव हा मन शांत करण्यासाठी आणि आराम करण्यासाठी कोल्हापूर शहरातील एक उत्कृष्ट ठिकाण आहे जून ते सप्टेंबर हा कालावधी या तलावाला भेट देण्यासाठी अगदी उत्तम समजला जातो कोल्हापूर बस स्थानकापासून हे ठिकाण 4.5 किलोमीटर अंतरावर आहे.

4. कोल्हापूर मार्केट

मित्रांनो जवळजवळ कोल्हापूरला जाणारा प्रत्येक पर्यटक हा या ठिकाणी आल्यानंतर खरेदी करायला विसरत नाही.ही खरेदी आपल्याला कोल्हापूर मार्केटमध्ये करता येते कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपल्याला खास करून कोल्हापुरी चप्पल आणि मसाले हवे हवेसे वाटतात.कोल्हापुरी चप्पल या मार्केटमध्ये आपल्याला अगदी माफक दरात मिळते.कोल्हापूर शहरातील पर्यटन स्थळांना भेट देणारा प्रत्येक पर्यटक आवर्जून या मार्केटला भेट देण्यासाठी येत असतो कोल्हापूर बस स्थानकापासून हे मार्केट मात्र तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

5. खासबाग मैदान

खासबाग मैदान हे कोल्हापूर शहरातील कुस्तीचा आखाडा म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे जे छत्रपती शाहू महाराजांच्या अनेक योगदानाने कोल्हापूर शहराला लाभलेले आहे.कोल्हापूरमध्ये 1907 साली या आखाड्याचे काम सुरू करण्यात आले होते आणि 1912 मध्ये ते पूर्ण झाले या मैदानाच्या सभोवताली प्रेक्षकांना बसण्यासाठी व व्यवस्थित कुस्ती पाहता यावी यासाठी उतरण केलेली आहे.एका वेळेस 25 ते 30 हजार लोक भारतीय बैठकीमध्ये बसू शकतील इतकी मोठी क्षमता या मैदानाची आहे.कोल्हापूर बस स्थानकापासून हे मैदान अवघ्या तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

6. शालिनी पॅलेस

कोल्हापूर शहरातील सर्वात सुंदर आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक म्हणून शालिनी पॅलेस ची ओळख आहे.19 व्या शतकाच्या सुरुवातीला कोल्हापूर संस्थानाच्या राजकन्या शालिनी राजे यांच्यासाठी हा आलिशान पॅलेस बांधण्यात आला होता.दोन मजली व आयताकृती असलेला हा राजवाडा वास्तूमध्ये पद्धतीचा आहे ज्याच्या चारही बाजूच्या कोपऱ्याला चार चौकोनी मनोरे असून त्यावर घुमट लावलेले आहेत.मनोऱ्याच्या वरच्या बाजूला काचेचे नक्षीकाम व मनोऱ्याचे घड्याळ लावलेले आहे त्यामुळे या वस्तूचे सौंदर्य खूप सुंदर दिसते.त्याच बरोबर राजवाड्याच्या अंतरंगात अनेक दालने असून ती अत्यंत कलात्मक रित्या व उत्तम सजावटीने सजवलेली आहेत.कोल्हापूर बस स्थानकापासून हे ठिकाण 4.5 किलोमीटर अंतरावर इतक्या आहे.

7. कणेरी मठ

कणेरी मठ हे ठिकाण कोल्हापूर शहरातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे ज्याला सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय म्हणून ओळखले जाते.साधारणतः 7 एकर इतके क्षेत्रामध्ये हे संग्रहालय विस्तारलेले आहे.या ठिकाणी आपल्याला प्राचीन ग्रामीण जीवनाचे वर्णन करणारी जवळपास 80 दृश्य आणि 300 पेक्षा जास्त पुतळे बघायला मिळतात.त्याच बरोबर कणेरी मठ हे भगवान शिवाचे मंदिर असलेले प्रसिद्ध पवित्र स्थान म्हणूनही ओळखले जाते या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी बरेच भाविक येत असतात चारही बाजूंनी सुंदर निसर्गाने भेटलेल्या या ठिकाणाला आपण सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत कधीही भेट देऊ शकतो कोल्हापूर बस स्थानकापासून कणेरी मठ हे ठिकाण 13 किलोमीटर इतके अंतरावर आहे.

8. ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क

कोल्हापूर शहरातील ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क ठिकाण रंगबिरंगी पाण्याच्या फुग्यासोबत खेळण्यासाठी एक उत्तम जागा आहे ज्या ठिकाणी आपण मित्रांबरोबर आणि कुटुंबासमवेत जाऊ शकतो.या पार्कमध्ये आठ रंगांमध्ये स्लाईट उपलब्ध आहेत या व्यतिरिक्त या ठिकाणी एक कॅफे आहे ज्या ठिकाणी आपण स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेऊ शकतो मात्र या ठिकाणाला भेट देण्यासाठी मे ते आक्टोंबर हा कालावधी अगदी योग्य समजला जातो.ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क हे ठिकाण सकाळी दहा ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत चालू असते जे कोल्हापूर बस स्थानकापासून 2.7 किलोमीटर इतके अंतरावर आहे.

9. भवानी मंडप

भवानी मंडप हे ठिकाण कोल्हापूर शहरातील सर्वात जुनी आणि प्रमुख वास्तू आहे जी पूर्वी छत्रपती शाहू महाराजांचा शाही दरबार आणि राजवाडा म्हणून ओळखली जायची.ही इमारत या शहरातील सर्वात महत्त्वाच्या हेरिटेज संरचनांपैकी एक आहे आणि तिचे सार्वजनिक स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे.या पॅलेसच्या आत मध्ये अनेक पुतळे,भरलेले प्राणी,लाकडी मुकुट आणि शाहू महाराजांची शिल्पे पाहायला मिळतात.भवानी स्मारक हे पूर्णपणे काळ्या दगडात बांधलेले आहे जे पाहण्यासाठी सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत खुले असते कोल्हापूर बस स्थानकापासून भवानी मंडप हे ठिकाण 3.2 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. 

10. डी वाय पी सिटी मॉल

कोल्हापूर पुणे हायवेवर असलेला डी वाय पी सिटी मॉल कोल्हापूर शहरात भेट देण्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण आहे.महाराष्ट्रातील अग्रगणने शॉपिंग सेंटर म्हणून या मॉलची ओळख आहे.या मॉलमध्ये आपल्याला बजेट फ्रेंडली ते प्रीमियम वस्तूंपर्यंत सर्व काही खरेदी करता येते त्याचबरोबर या ठिकाणी काही अशी दुकाने आहेत ज्या ठिकाणी आपण कपडे,उपकरणे,दागिने,खेळणी आणि इतर अनेक वस्तू खरेदी करू शकतो.त्याचबरोबर खवय्यांसाठी या ठिकाणी अनेक रेस्टॉरंट देखील आहेत जिथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचा अनुभव घेऊ शकतो.कोल्हापूर बस स्थानकापासून डी वाय पी सिटी मॉल हे ठिकाण 1.7 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे (Tourist places of Kolahpur in Marathi) ही माहिती जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment