सिंहगड किल्ला माहिती मराठी | Sinhagad fort information in marathi

Sinhagad fort information in marathi: सिंहगड हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. पुण्याच्या नैऋत्येला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 4400 फूट इतका उंच आहे. सिंहगड हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारात येत असून त्याची चढाईची श्रेणी ही मध्यम प्रकाराची आहे.  सिंहगड या किल्ल्याचे ठिकाण म्हणजे भारतात महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यात आहे.

Sinhagad fort information in marathi
सिंहगड किल्ला माहिती मराठी (Sinhagad fort information in marathi)

तसेच पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या डोंगररांगेवर हा गोड आहे. सिंहगड हा किल्ला पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बस स्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणा कडून जाणाऱ्या रस्त्याने सिंहगड अंदाजे 35 किलोमीटरवर आहे.या किल्ल्यावर कोंढाणेश्वराचे मंदिर आहे.हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते.

Contents

सिंहगड किल्ला माहिती मराठी (Sinhagad fort information in marathi)

नावसिंहगड
उंची4400 फूट
जिल्हापुणे
प्रकार गिरीदुर्ग
जवळचे गाव सिंहगड
सिंहगड किल्ला माहिती मराठी (Sinhagad fort information in marathi)

आत एक पिंडी व साम असणारे हे मंदिर यादवकालीन आहे. कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहेत. यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात बहिरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे. सिंहगडाच्या पश्चिमेस कल्याण दरवाजा आहे.

कोंढणपूर वरून पायऱ्या त्याच्या कल्याण गावातून वर आल्यास या दरवाजातून आपल्याला प्रवेश होतो. हे एका मागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाजाच्या दोन्हीकडे बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहुत अशी दगडी शिल्पे होती. त्याचप्रमाणे या गडावर उदयभंचे स्मारक, राजाराम स्मारक, सुभेदार तानाजीचे स्मारक आहेत.

किल्ल्याचा इतिहास

सिंहगड किल्ल्याच्या आधीचे नाव कोंडाणा आहे. स्थानिक महादेव कोळी लोकांच्या अख्यायिका नुसार कौंडण्य ऋषी यांनी तपस्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले. हा किल्ला पूर्वीपासून महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता. हा किल्ला पूर्वेचे पुण्येनगरचे मुख्य होते. हा किल्ला महादेव कोळी राजा नागनाथ नाईक यांच्या ताब्यात होते. पुढे इसवी सन  1647 मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले.

शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला  परत आदिलशहा ला दिला. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि त्यांचे बाल मित्र तानाजी मालुसरे आणि त्यांचा मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई च्या दरम्यान जिंकला होता. या लढाई तानाजींना वीर मरन आले. आणि प्रानाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले.

किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे

दारूचे कोठार

दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दिनांक 11 सप्टेंबर 1952 मध्ये या कोठारावर वीज पडली. या गडावरील त्यावेळच्या फडणीसांची घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

टिळक बंगला

रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. 1915 साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यावर झाली होती.

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सिंहगड कोणत्या जिल्ह्यात आहे ?

सिंहगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात आहे.

सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा किल्ला असे होते.

तानाजी मालुसरे हे कोणत्या किल्ल्याच्या लढाई मध्ये मरण पावले ?

किल्ले सिंहगड च्या लढाई मध्ये.

कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता ?

कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता .

आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोणी म्हणाले ?

तान्हाजी मालुसरे.

शिवरायांचा राज्याभिषेक केव्हा झाला ?

शिवरायांचा राज्याभिषेक दिनांक 6 जून 1674 ला झाला.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या किल्ल्यावर झाला ?

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर झाला.

सिंहगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?

सिंहगड किल्ला हवेली तालुक्यात आहे.

सिंहगड किल्ला पुणे शहराच्या कोणत्या दिशेला आहे ?

सिंहगड किल्ला पुणे शहराच्या नैऋत्य दिशेला आहे.

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण सिंहगड किल्ला माहिती मराठी (Sinhagad Fort Information Marathi) जाणून घेतली. तुम्हाला सिंहगड किल्ला माहिती मराठी (Sinhagad Fort Information Marathi) ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment