तत्पुरुष समास उदाहरण मराठी | tatpurush samas example marathi

tatpurush samas example marathi : तत्पुरुष समास म्हणजे ज्या समासातील दुसरी पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेल्या शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.तत्पुरुष समास म्हणजे ज्यामध्ये उत्तरपदाचे प्राबल्य असते, म्हणजे पहिला पाद गौण आणि उत्तरपदाला प्राधान्य असते आणि समास करताना मधला विक्षेप नाहीसा होतो.यामध्ये सर्व शब्द बनवताना, शब्दांचे विक्षेपण चिन्ह वगळले जातात.

tatpurush samas example marathi
तत्पुरुष समास उदाहरण मराठी (tatpurush samas example marathi)

तत्पुरुष समास उदाहरण मराठी (tatpurush samas example marathi)

उदाहरणार्थ

  • तोंडपाट – तोंडाने पाट
  • देवपूजा – देवाची पूजा
  • महामानव – महान असलेला मानव
  • राजपुत्र – राजाचा पुत्र
  • तोंडपाठ – तोंडाने पाठ
  • गायरान – गाईसाठी रान
  • वनभोजन – वनातील भोजन

वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

तत्पुरुष समासाचे प्रकार (types of tatpurush samas)

  • विभक्ती तत्पुरुष समास
  • कर्मधारय तत्पुरुष समास
  • द्विगु समास
  • अलुप तत्पुरुष समास
  • उपपद तत्पुरुष समास
  • नत्र तत्पुरुष समास
  • मध्यम पडलोपी समास

विभक्ती तत्पुरुष समास

विभक्ती तत्पुरुष म्हणजे ज्या तत्पुरुष समासात एखाद्या विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययचा लोक करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • गर्भश्रीमंत – गर्भापासून श्रीमंत
  • गायरान – गाईंचे रान

कर्मधारय तत्पुरुष

समास म्हणजे ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत किंवा या समासातील दोन्ही पदे प्रथम विभक्तीत असते तेव्हा त्यास कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • पितांबर – पीत असे अंबर
  • चंद्रवधन – चंद्रासारखे वधन

या समासात पहिले पद हे विशेषण व दुसरे पद नाम असते. यातील दोन्ही पदार्थातील संबंध हा उपमान व उपमेय स्वरूपाचा असतो.

द्विगु समास

द्विगु समास म्हणजे ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून समुदायाचा बोध होतो त्यास द्विगु समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • नवरात्री – नवरात्रींचा समूह
  • पंचवटी – पाच वडांचा समुह

अलुप तत्पुरुष समास

अलुप तत्पुरुष समास म्हणजे अलुप म्हणजे लोक न पाळणारे ज्या विभक्ती तत्पुरुशात पहिलं पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोभ होत नाही त्यास अलुप तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • अग्रेसर, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग इत्यादी.

उपपद तत्पुरुष समास

उपपद तत्पुरुष समास म्हणजे ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद प्रधान असून ते धातू साधित किंवा कृदंत असतो त्याला उपपद तत्पुरुष समासअसे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • ग्रंथकार – ग्रंथ करणारा
  • वंशज – जन्मणार

नत्र तत्पुरुष समास

नत्र तत्पुरुष समास म्हणजे ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. या शब्दातील पहिले पद अ, अन्, न, नी, गैर, ना, यासारखी निषेध दर्शवणारी असतात.

उदाहरणार्थ

  • अनावधान, नापासन, बेडर, गैरहजर, निरोगी इत्यादी.

मध्यम पडलोपी समास

मध्यम पडलोपी समास म्हणजे ज्या समासात दोन शब्दांमधील विभक्ती प्रत्यय शिवाय संबंध दाखविणाऱ्या शब्दाचा लोभ झालेला असतो. त्याला मध्यम पडलोपी समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • साखरभात – साखर घातलेला भात.
  • चुलतभाऊ – चुलत्या चा मुलगा म्हणून भाऊ.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण तत्पुरुष समास उदाहरण मराठी (tatpurush samas example marathi) जाणून घेतली. तत्पुरुष समास उदाहरण मराठी (tatpurush samas example marathi) माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

1 thought on “तत्पुरुष समास उदाहरण मराठी | tatpurush samas example marathi”

  1. अत्यंत उपयुक्त व सहज समजणारी माहीती….धन्यवाद.

    Reply

Leave a Comment