Oats In Marathi : सध्या ची तरुणाई ही फिटनेस फ्रीक असल्याच पाहायला मिळतं त्यामुळे फिट राहण्यासाठी अनेक जण वर्कआउट करण्यासोबतच डायटही घेतात.हे डायट करत असताना अनेक जणांना मधल्या वेळेत भूक लागते त्यामुळे या वेळेत नेमकं काय खावं असा प्रश्न अनेकांना पडतो.त्यावेळी ओट्स हा सर्वोत्तम पर्याय आहे.ओट्स कोणत्याही वेळी खाता येऊ शकतात.अनेक जण सकाळी नाष्ट्यामध्ये ओट्स खातात.विशेष म्हणजे ओट्स शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असून त्याचे काही शारीरिक फायदे आहेत ते आज आपण या लेखातून जाणून घेऊया.
Contents
ओट्स माहिती मराठी (Oats In Marathi)
अनेक जण सकाळी नाश्त्यांमध्ये याचा समावेश करतात.पण काही लोकांना ओट्स म्हणजे नक्की काय व ओट्स खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे आहेत हेच माहित नसतं.ओट्स हे इतर तृणधान्यासारखेच एक धान्य आहे.हे धान्य कमी तापमान असलेल्या ठिकाणी वाढतं.यामुळे यांची लागवड मुख्यतः युरोप,अमेरिका,कॅनडा,रशिया,ऑस्ट्रेलिया,फ्रान्स,चायना यासारख्या देशांमध्ये केली जाते.भारतात याची लागवड पंजाब व हरियाणा या राज्यात केली जाते.ओट्स चे विविध प्रकार देखील उपलब्ध असतात.
- रोल्डओट्स
- इन्स्टंट ओट्स
- स्टील कट ओट्स
- ओल्ड ब्रँड ओट्स
- स्कॉटिश ओट्स
पूर्वी ओट्स चा वापर जनावरांचे खाद्य म्हणून केला जात असे.परंतु यात अनेक पोषण मूल्य असल्याने ओट्स चा वापर मानवी खाद्य म्हणून देखील होऊ लागला.ओट्स पासून ओट्स केक,ओट्स ब्रेड,ओट्स मिल्क कुकीज बनवले जातात.ओट्स चा समावेश हेल्दी पदार्थांमध्ये होतो कारन यात मॅग्नेशियम,पोटॅशियम,फायबर,प्रोटीन,झिंक,कॅल्शियम,सेलियम,कार्बोहायड्रेट्स,सोडियम, नियासीन, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन-बी,फॉस्फरस,फॅटी ऍसिड, अँटिऑक्सिडंट यांसारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो.ओट्स मध्ये इतक्या प्रमाणात जीवनसत्त्वे असल्याने हे खाण्याचे आपल्या शरीराला फायदेही बरेच आहेत.ते कोणतेही आता आपण जाणून घेऊया.
ओट्स खाण्याचे फायदे.
- ओट्स खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
- ओट्स मुळे वजन नियंत्रणात राहते.
- ओट्स मुळे बॉडी मधून बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते,तर पोट त्याने पटकन भरत.
- ओट्स मुळे दम्याचा धोकाही कमी होतो आणि रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो.
- हृदयाचे आजार होण्याची शक्यता देखील ओट्सच्या सेवनाने कमी होते.
- ओट्स अँटिऑक्सिडंट चे काम देखील करतात.
- तुम्हालाही जर वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारामध्ये ओट्सचा समावेश करा.
- ओट्स मध्ये अँटी फंगल व अंतीबॅक्टरियल गुणधर्म देखील आढळतात.
- ओट्स हे पूर्णपणे ग्लूटेनमुक्त आहेत.अर्थात यात ग्लूटेनचे प्रमाण आढळत नाही.
- नियमित ओट्स खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते आणि वातावरणातील इन्फेक्शन पासून शरीराचे रक्षण होते.
- ओट्स खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- ओट्स मध्ये अँटिऑक्सिडेंट भरपूर प्रमाणा असतात.शिवाय यात फायबर ही पुरेशी असतात.ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आनी हृदयावरचा ताण कमी होतो व हृदयाचे आरोग्य सुधारते.
- ओट्स खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते व पोट साफ राहण्यास मदत होते त्याचबरोबर अन्न पचन व पोटाच्या इतर समस्यांचे प्रमाण कमी होते.
- ओट्स खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
- नियमित ओट्स खाल्ल्याने हायपर टेन्शन अर्थात रक्तदाब नियंत्रणात राहतो.कारण ओट्समध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात.
- ओट्स मध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात त्यामुळे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
- ओट्स खाल्ल्याने वारंवार भूक लागत नाही ज्यामुळे अपत्य कारक व अधिक प्रमाणात आहार घेतला जात नाही.
- ओट्स खाल्ल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते.
- प्रतापगड किल्ला माहिती मराठी (Pratapgadh fort information in marathi)
- राजस्थान राज्य माहिती मराठी (Rajasthan State Information in Marathi)
ओट्स खाण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे ते पुढीप्रमाणे
- ज्यांना वजन वाढवायच असेल त्यांनी ओट्स चे सेवन कमी करावं.
- बाजारात उपलब्ध असलेल्या ओट्स मध्ये आर्टिफिशियल शुगर असू शकते जी मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते.
- ओट्स चे सेवन प्रमाणातच कराव.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
ओट्स म्हणजे काय?
ओट्स हे इतर तृणधान्यासारखेच एक धान्य आहे.हे धान्य कमी तापमान असलेल्या ठिकाणी वाढतं.यामुळे यांची लागवड मुख्यतः युरोप,अमेरिका,कॅनडा,रशिया,ऑस्ट्रेलिया,फ्रान्स,चायना यासारख्या देशांमध्ये केली जाते.भारतात याची लागवड पंजाब व हरियाणा या राज्यात केली जाते.ओट्स चे विविध प्रकार देखील उपलब्ध असतात.रोल्डओट्स,इन्स्टंट ओट्स,स्टील कट ओट्स,ओल्ड ब्रँड ओट्स,स्कॉटिश ओट्स.
ओट्स कसे तयार होतात?
ओट्स हे तृणधान्य वनस्पती, अव्हेना सॅटिवा मधील धान्ये आहेत आणि एकदा कापणी केल्यावर जनावरांच्या खाद्य, त्वचेची उत्पादने किंवा अन्नामध्ये वापरण्यासाठी प्रक्रिया केली जाते. अन्न वापरासाठी, ओट्स दळणे, वाफवलेले, गरम करणे आणि भट्टीत थंड केले जाते, ज्यामुळे चव येते. ओट्स नंतर फ्लेक्स, ओटचे जाडे भरडे पीठ किंवा पीठ तयार करण्यासाठी रोल, कापले किंवा ग्राउंड केले जातात.
निष्कर्ष (summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण ओट्स माहिती मराठी (Oats In Marathi) जाणून घेतली. ओट्स माहिती मराठी (Oats In Marathi) हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.